Duryodhana History | Mahabharata Facts Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Duryodhana History: भीमापेक्षा गदायुद्धात तरबेज, एक पत्नीव्रताची शपथ घेणारा सुयोधन 'दुर्योधन'

Mahabharata Facts: महाभारतात दुर्योधनाला विनाकारण खलनायकाच्या रूपात रंगवले आहे. वास्तविक दुर्योधन हा सुयोधन होता.सुयोधनाचा कुरूंच्या राज्यावरचा अधिकार न्याय्य होता.

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता दामोदर नायक

महाभारतात दुर्योधनाला विनाकारण खलनायकाच्या रूपात रंगवले आहे. वास्तविक दुर्योधन हा सुयोधन होता.सुयोधनाचा कुरूंच्या राज्यावरचा अधिकार न्याय्य होता. सुयोधन राजा धृतराष्ट्राचा ज्येष्ठ औरस पुत्र होता तर धर्म पंडूचा अनौरस पुत्र होता. धृतराष्ट्र आंधळा असल्याने केवळ सोयीसाठी धृतराष्ट्राच्या वतीने त्याचा बंधू पंडू हस्तिनापूरचे राज्य करत होता. तत्कालीन कायद्याप्रमाणे कुरूंचे सिंहासन धर्माला नव्हे तर सुयोधनाला मिळणेच रास्त होते.

कुरुक्षेत्रावरील युद्धात कौरवांचे सैन्य ११ अक्षौहिणी होते तर पांडवांचे ७ अक्षौहिणी होते. कौरवांना मद्र, गांधार, काश्मीर, मगध, द्वारका, प्रागज्योतिषपूर, सौराष्ट्र, त्रिगर्त, सिंधुदेश, संशप्तक, महिख्यती, वृष्णि, आंबट ह्या राज्यांचा पाठिंबा होता तर पांडवांना पांचाल, मत्स्य, पोडि, काशि, कैवर्त, आंध्र, केकय, पांड्य, अवंती, सत्यव्रत, करूष ह्या राज्यांचा पाठिंबा होता. ह्याचाच अर्थ पांडवांच्या तुलनेने कौरवांना भरतवर्षातील राजांचा अधिक पाठिंबा होता व त्यांना पांडवांपेक्षा कौरवांची बाजू अधिक न्याय्य वाटत होती.

पांडव बारा वर्षांच्या वनवासात व एका वर्षाच्या अज्ञातवासात गेले तेव्हा ह्या तेरा वर्षांच्या काळात दुर्योधनाने हस्तिनापूरवर राज्य केले. ह्या कालावधीत एकाही दुष्प्रकाराची नोंद झाली नाही. उलट सुयोधनाचा कारभार कार्यक्षम होता. वाखाणण्याजोगा होता.

भानामतीशी विवाह केल्यानंतर एक पत्नीव्रताची शपथ घेणारा सुयोधन वेगळा ठरतो. सुयोधन भीमापेक्षा गदायुद्धात अधिक तरबेज होता. तो बलरामाचा शिष्य होता. बलरामाला सुयोधनाची बाजू रास्त वाटत होती.

महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग भारतात बौद्ध धर्म रुजल्यानंतर महाभारतात प्रविष्ट केलेला आहे. केवळ कृष्णाचे माहात्म्य वाढवण्यासाठी हा प्रसंग मागाहून महाभारताच्या मूळ संहितेत घुसडलेला आहे.

अभिमन्यू, धृष्टद्युम्न व द्रौपदी पुत्र प्रतिविंध्य, श्रुतसोम, श्रुतकिर्ती, शतानिक व श्रुतसेन ह्यांचा कौरवांनी केलेला वध युद्धधर्म भंगून केलेला होता पण पांडवांचा अधर्म त्याहून अधिक होता.

भीष्म, द्रोण, जयद्रथ, कर्ण व सुयोधन ह्यांचे वध युद्धनियम भंगून केले होते. भीमाच्या कागाळ्यांना सुयोधन जशास तसे उत्तर देतो. सुयोधन मित्रत्वाच्या नात्याला जपतो. पितामह भीष्म व गुरुवर्य द्रोणाचार्य कुरुक्षेत्रावरील युद्धात पांडवांच्या बाजूने लढले नाहीत तर सुयोधनाच्या कौरवपक्षाच्या बाजूने लढले.

भारतवर्षातील नाग, किरात, निषाद, राक्षस, असुर, गंधर्व, किन्नर, यवन, म्लेंच्छ ह्या वंशांचा सुयोधनाला पाठिंबा होता. सुयोधनाच्या खाती कृष्णार्जुनाप्रमाणे खांडववन जाळून नागवंशीयांचे निर्दालन करण्याचे पाप नाही.

धर्मराजाच्या राजसूय यज्ञात आमंत्रित म्हणून आलेल्या शिशुपालाची श्रीकृष्ण हत्या करतो. सुयोधनाच्या राज्यात असले एकही अशोभनीय दुष्कृत्य घडले नाही.

भारतात एकाही पांडवाचे देऊळ नाही. पण उत्तर भारतात सुयोधनाचे देऊळ आहे ही एकच गोष्ट सुयोधनाच्या माहात्म्याची साक्ष आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कांदोळीतील व्हिलामध्ये चोरी, लाखोंचा ऐवज लंपास; कळंगुट पोलिसांत तक्रार

Mungul Gangwar: मुंगूल गँगवॉरप्रकरणी अमोघ नाईकला सशर्त जामीन मंजूर, इतरांच्या जामिनावर सोमवारी निवाडा

Goa Cristmas Celebration: नाताळनिमित्त राजधानीत विद्युत रोशणाई, चर्चस्क्वेअर परिसर सजला; राज्यात उत्साहाचे वातावरण

Karnataka Road Accident: कर्नाटकात भीषण अपघात, ट्रक-बसच्या धडकेत 17 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

Vagator: वागातोर भागात अजून एका नाइट क्लबची भर! एका भागीदारावर कथित आरोप

SCROLL FOR NEXT