मडगाव: भाजपच्या हातात असलेली दवर्ली-दिकरपाल पंचायत भाजपाकडेच रहावी यासाठी चार दिवसापूर्वी सरपंच म्हणून निवडून आलेले मिनीन कुलासो यांच्या विरोधात भाजपच्या सहा पंचांनी अविश्वास ठराव आणला होता. मात्र मतदानाच्या दिवशी भाजपचे पंच असलेले संतोष नाईक हे गैरहजर राहिल्यामुळे या अविश्वास ठरावावरील मतदान न होताच हा ठराव बारगळला.
यामुळे भाजपला दुसऱ्यांदा या पंचायतीत अपशकून झालेला असून ही पंचायत भाजपच्या हातातून निसटली आहे. चार दिवसांपूर्वी भाजपच्याच दोन सदस्यांनी विरोधी मतदान केल्याने कुलासो हे भाजपचे उमेदवार विद्याधर आर्लेकर यांच्या विरोधात ७ विरुद्ध ५ मतांनी निवडून आले होते. त्यानंतर अवघ्या चार तासात कुलासो यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता.
पण मतदानाच्यावेळी आवश्यक असलेले पंच एकत्र करण्यास भाजपला अपयश आल्याने त्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. आज हा अविश्वास ठराव मतदानास आला असता, या पंचायतीचे माजी सरपंच साईश राजाध्यक्ष यांच्यासह संपदा नाईक, विधी वरक व विद्याधर आर्लेकर हे चारच भाजपचे पंचसदस्य उपस्थित होते. त्यामुळे अपेक्षित असलेले सहा सदस्यांचे पाठबळ त्यांना मिळू शकले नाही. गैरहजर असलेल्या सदस्यांपैकी संतोष नाईक यांनी या अविश्वास ठरावावर सही केली होती.
गैरहजर असलेले संतोष नाईक हे आमदार उल्हास तुयेकर यांचे समर्थक पंच असल्याचे सांगितले जात आहे. मात्र भाजपच्याच सदस्याने या मतदानाकडे पाठ फिरविल्याने भाजपच्या ताब्यात असलेली ही पंचायत त्यांच्या हातातून निसटली आहे. ही घटना आमदार तुयेकर यांच्यासाठी विरोधी ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.