Children Screen Time Control Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Children Screen Time Control: मुलांच्या 'स्क्रीनटाईम'वर हवं नियंत्रण; आधी पालकांनीच मोबाईल बाजूला ठेवायला हवा

Children Screen Time Control: आईवडीलच जर मोबाईलवर सोशल मीडियावर आसक्त होऊन व्यग्र राहत असतील तर पालकांना मुलांवर निर्बंध घालण्याचा अधिकार राहत नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

आईवडीलच जर मोबाईलवर सोशल मीडियावर आसक्त होऊन व्यग्र राहत असतील तर पालकांना मुलांवर निर्बंध घालण्याचा अधिकार राहत नाही. मुलं अनुकरण करतात. आमची पिढी मैदानावर क्रिकेट खेळायची. आताची मुलंही खेळतात पण स्क्रिनबरोबर. मध्यरात्रीपर्यंत.

आज मुलांचे मोबाईलचे व्यसन वाढत आहे. त्यामुळे विविध वैद्यकीय समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. डोळ्यांच्या समस्या असतातच. परंतु मानसिक भावनिक समस्यांचे जाळे या मोबाईल नावाच्या खेळण्याने रचले आहे. व्यावसायिक मानसोचपचारतज्ञ म्हणून आमच्याकडे पालक मुलांना आणतात, तेव्हा त्यांच्याशी बोलल्यावर अनेक मुळांचा उलगडा होतो. मुख्य मुळं आईवडीलच असतात. तेच जर मोबाईलवर सोशल मीडियावर आसक्त होऊन व्यग्र राहत असतील तर पालकांना मुलांवर निर्बंध घालण्याचा अधिकार राहत नाही. मुलं अनुकरण करतात.

आमची पिढी मैदानावर क्रिकेट खेळायची. आताची मुलंही खेळतात पण स्क्रिनबरोबर. मध्यरात्रीपर्यंत. रात्री दहा वाजल्या नंतर मोबाईल ‘स्वीच ऑफ’ करायला पाहिजे. आपलेच नातेवाईक तासनतास बोलतात पण त्यात इतरांचे आजार, समस्या, ताण, अपमान असला नकारात्मक कचरा जास्त असतो. तो विषारी कल्लोळ मनात उतरल्यावर झोपमोड होते. रक्तदाब असलेल्याना जास्त त्रास होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो वा ती फ्रेश राहत नाही. ऑफिसात एकाग्रतेवर परिणाम होतो. चिडचिड होते. हे परिणाम म्हणजे एक वर्तुळाकार दुष्टचक्र आहे.

मुलांना हॉटेलात नेले तर आपल्याच टेबलावर पुढं बसलेल्यांना त्रास होतो याचं भान न ठेवता, इयर-फोन न लावता मुलं मोठमोठ्या आवाजात गेम्स खेळत राहतात. आई वडील खाताना घरी किंवा बाहेर फोनवर बोलतच असतात. वदनी कवळ घेता, हा श्र्लोक समर्थ रामदास यांनी लिहिला. आज अन्नाचा घास घेताना अगोदर मोबाईलवर बोटं ओढली जातात. काही मुलांना मोबाईल नसला तर जेवणच जात नाही.

मोबाईल जेवणाच्या टेबलापासून दूर ठेवावा. मुलांना ऑनलाइन गेम्स, सोशल मीडिया आणि व्हिडिओ पाहण्याची सवय लागते. ते व्यसन बनतं. मित्रांकडून आय फोन वा उच्च क्षमतेचा मोबाईल वापरण्याचा दबाव आल्यावर तो वा ती पालकांकडे आताच पाहिजे मला तो स्मार्टफोन, असा हट्ट धरून बसते. त्याला पैसे किती पडतात याची समज मुलांना नसते. इथं सुवर्णमध्य गांठून शिस्तीचे संस्कार हवेच. आपली ऐपत मुलांना स्पष्ट करायला पाहिजे.

मुलांना मोबाईल वापरण्यासाठी ठराविक वेळ द्यावा. अभ्यास, खेळ आणि विश्रांती यांचा समतोल राखावा. नियोजन हवं. वाचन, चित्रकला, संगीत, खेळ अशा सर्जनशील उपक्रमांकडे मुलांचे लक्ष वळवायला हवे. मोबाईलमध्ये ‘पॅरेंटल कंट्रोल’ वापरून अयोग्य अॅप्स व वेबसाईट्सवर मर्यादा आणावी. हिंसा, सेक्स यासारखे व्हिडियो पाहून त्यांचं डोकं भणाणून जाऊ शकतं. सगळंच पचवायची ताकद त्यांच्यात नसते. भावनांवर संवेदनांवर त्याचा परिणाम होतो.

म्हणून दक्षता घ्यायला हवी. मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून त्यांच्या आवडी-निवडी जाणून घ्याव्यात. मोबाईलपेक्षा प्रत्यक्ष खेळ, चर्चेला प्रोत्साहन द्यावे. त्यांना गोष्ट सांगावयाचा आग्रह करावा. सर्वांनी ऐकावं. पालक टीव्ही सिरीयल बघत बसले तर माझ्याशी कोणच बोलत नाही, अशी घुसमट मुलाला होते व तो मोबाईलमध्ये डुंबून जातो. शिक्षकांनी वर्गात मोबाईलचा शैक्षणिक उपयोग दाखवावा, त्याचा अतिरेक टाळण्याचेमार्गदर्शन करावे.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा आधुनिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यातून शिक्षण, माहिती आणि मनोरंजन मिळते. पण त्याचा अतिरेक मुलांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो. पुढची पिढी सर्वांगाने निकोप घडली पाहिजे. हे उत्तरदायित्व आमचं. योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि पर्यायी उपक्रमांच्या मदतीने मोबाईलचे व्यसन कमी करता येते. पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्रित प्रयत्न केल्यास मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग शिकवता येईल. त्यातूनच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT