Indian Freedom Fighters Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Indian Freedom Fighters: 'धरती आबा' बिरसा मुंडा यांची प्रेरणादायी गाथा; जंगल, जमीन आणि आदिवासींच्या अस्मितेसाठी ब्रिटिश सत्तेला दिले आव्हान

Birsa Munda: बिरसा यांनाही असे वाटत होते की ‘मी माझ्या समाजाचा उद्धारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

रेखा डायस

बिरसा यांनाही असे वाटत होते की ‘मी माझ्या समाजाचा उद्धारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे. मी माझ्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, आदिवासींची इंग्रजांच्या जाचातून सुटका केली पाहिजे’. म्हणूनच बिरसा मुंडा यांचे चाहते त्यांचे अनुयायी बनले. ‘धरती आबा’ बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे, यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडक्यात...

बिरसा मुंडा यांना जननायक म्हणून संबोधले जाते. फक्त पंचवीस वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी अत्यंत मोठी क्रांती घडवून आणली. ते आदिवासी समाजातील असून जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या प्रत्येक गावच्या प्रमुखाला ‘मुंडा’ असे म्हणतात. ते झारखंडमधील खुटीगावचे रहिवासी होते.

आदिवासी असूनही बिरसा मुंडा अत्यंत बुद्धिमान, शिस्तप्रिय आणि नेतृत्वगुणांनी संपन्न होते. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी उलिहातू येथे झाला. ते भारतातील आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होते. आदिवासी हक्कांसाठी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठी आंदोलने केली. त्यामुळेच त्यांना ‘धरती आबा’ म्हणून सन्मानाने ओळखले जाते.

१८९९ पासून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनांची सुरुवात केली. बिरसा मुंडा यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे ब्रिटिश सरकारला आदिवासी धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करावे लागले होते. आदिवासी लोकांना सरकारी अधिकाऱ्यांचा, जमीनदारांचा आणि नंतर इंग्रजांचा खूप जुलूम सहन करावा लागत होता. हे आदिवासी लोक जंगलांवरच अवलंबून होते आणि तेथेच ते शेतीही करत. परंतु इंग्रजांच्या राजवटीत शेतीवर विविध कर बसवले गेले. कर वसूल करण्यासाठी इंग्रजांनी आणलेल्या ठेकेदारांकडून अगदी छोट्या कारणांवरूनही दुप्पट–तिपटीने कर आकारला जात असे. ज्यांना हा कर भरता येत नसे, त्यांच्या जमिनी बळकावल्या जात.

यामुळे अनेक आदिवासी भूमिहीन झाले, शिवाय त्यांनी केलेल्या मजुरीचाही योग्य मोबदला त्यांना मिळत नसे. जमीनदारांच्या चैनीचे सर्व खर्च आदिवासींकडून वसूल केले जात. त्यांची स्वतःची न्याय-पंचायतीची व्यवस्था इंग्रजांनी मोडून काढली आणि त्यांच्या जागी आपलीच न्यायदान पद्धत लादली. ही पद्धत आदिवासी समाज पेलू शकत नव्हता, त्यामुळे ते अधिकाधिक कंगाल होत चालले. याच काळात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आदिवासी भागात प्रवेश करून जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू केला. धर्मांतरासाठी त्यांनी आदिवासींना विविध प्रलोभने दाखवण्यास सुरुवात केली.

बिरसाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते. गोरापान, अत्यंत तेजस्वी, उंच तगडा, प्रसन्नमुख, डोक्याला फेटा, पायात खडावा असे त्याचे रूप सर्वांनाच आकर्षित करुन घ्यायचे. त्यामुळे आणि त्याच्या नेतृत्वगुणामुळे समाजाचे लोक भराभर त्याचे अनुयायी बनले. त्यांना तर तो ‘धरतीचा देवच’ वाटायचा. बिरसालाही असे वाटत होते की ‘मी माझ्या समाजाचा उद्धारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे. मी माझ्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे त्यांची इंग्रजांच्या जाचातून सुटका केली पाहिजे’. म्हणूनच बिरसा मुंडा यांचे चाहते त्यांचे अनुयायी बनले. त्यांच्यामधून त्यांनी शेकडो चांगले लढवय्ये निवडून आपले सैन्य सज्ज केले. गया मुंडा या आपल्या जिवलग मित्राला त्यांनी आपला सेनापती म्हणून नियुक्त केले.

सर्वांनी आपल्या समाजावर इंग्रज अधिकाऱ्यांकडून, ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून, जमीनदारांकडून व ठेकेदारांकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली व स्वराज्य स्थापन करण्याचे ठरविले. इंग्रज सरकारला त्यांच्या हालचालीचा सुगावा लागलाच होता. २४ ऑगस्ट१८९५ रोजी रांची जिल्ह्याच्या इंग्रज पोलिस इन्स्पेक्टरने अनेक शिपायांसह रात्री बिरसाच्या घरावर छापा टाकून झोपेत असतानाच त्याला आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. बिरसाला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व ५० रु. दंड केला व त्याच्या साथीदाराला प्रत्येकी २०/२० रु. दंड केला.

कैदेतून सुटून आल्यानंतर बिरसाने नव्या जोमाने संघर्ष सुरू केला. इंग्रजांच्या अनेक ठाण्यांवर त्याने हल्ले केले. पराक्रमाची शर्थ केली. पण इंग्रजांच्या बंदुकांपुढे त्यांची परंपरागत हत्यारे निष्प्रभ ठरली. शेकडो जवान मृत्युमुखी पडले. एका लढाईत सेनापती गया मुंडा ठार झाला. बिरसाचा मुक्काम घनदाट जंगलातील टेकड्यांवर गुप्त ठिकाणी असे. त्यामुळे तो इंग्रजांच्या हाती लागणे अशक्यप्राय होते. परंतु घरभेद्यांकडून इंग्रजांना त्याचा सुगावा लागताच त्याला घेरून पकडण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे ८० अनुयायीसुद्धा जेरबंद झाले.

तेव्हा रांचीच्या इंग्रज जिल्हाधिकाऱ्याने बिरसाला जमीनदारी देण्याची लालूच दाखवून त्याने आपला उद्योग सोडून द्यावा, असे सांगितले. पण बिरसाने ते धुडकावले. अखेर तुरुंगात त्याचे फार हाल करण्यात आले आणि विष देऊन मारण्यात आले. बिरसा पटकीमुळे मेला, असे इंग्रज सरकारने खोटेच जाहीर केले. त्याच्या अनुयायांनाही जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या व बिरसाने छोटा नागपूरमध्ये स्वातंत्र्यासाठी आरंभिलेला लढा चिरडून टाकण्यात आला.

अशारीतीने कोल समाजाचा हा ‘धरतीचा देव’ बिरसा मुंडा जानेवारी १९०० मध्ये त्या धरतीच्या कुशीतच विसावला. बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारक होते. बिरसा मुंडा यांना जननायक हा किताब लोकांनी बहाल केला. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. ते एकटेच क्रांतिकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक तिकीटही जारी केले असून झारखंड मधील रांची येथे स्मारक बांधण्यात आलेले आहे. अशाप्रकारे फक्त पंचवीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खूप मोठी क्रांती घडवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT