Ancient Baobab (Gorakh Chinch) tree introduced to India by Arab traders Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

sulabhati lake agasaim baobab trees: ॲडन्सन या वनस्पतीशास्त्रज्ञाने या झाडाचा बराच अभ्यास केला होता आणि त्यासाठी त्यांनी गोरखचिंचेच्या बऱ्याच जुन्या आणि महाकाय वृक्षांचे निरीक्षण केले होते. त्यांनी पाहिलेल्या एका गोरखचिंचेच्या वृक्षाचे वयोमान पाच हजार वर्षे असल्याचे मत त्यांनी मांडले होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

राजेंद्र पां. केरकर

आफ्रिकेतील वृक्ष संपदेत महत्वपूर्ण गणला जाणारा ‘बाओबाब’ गेल्या शेकडो वर्षांपासून भारतात असून, कधीकाळी त्याच्या महाकाय लांबट फळांचा उपयोग कमंडलू तयार करण्यासाठी केल्याने, त्याचप्रमाणे बहुधा नाथ संप्रदायातील क्रांतिकारक गणल्या जाणाऱ्या गोरक्षनाथामुळे या वृक्षाला गोरखचिंच असे नाव प्राप्त झाले असावे. ‘ॲडेन्सोनिया डिजिटटा’ असे त्याला वनस्पती शास्त्रात लाभलेले नाव, दोन शब्दांच्या संयोगातून निर्माण झालेले आहे. या वृक्षाच्या शास्त्रीय संज्ञेतील ॲडेन्सोनिया हा शब्द फ्रेंच वनस्पतीशास्त्रज्ञ एम. ॲडन्सन यांच्या नावावरून तर हाताच्या बोटासारख्या पानांच्या आकारावरून ‘डिजिटीटा’ हे नाव प्राप्त झालेले आहे.

ॲडन्सन या वनस्पतीशास्त्रज्ञाने या झाडाचा बराच अभ्यास केला होता आणि त्यासाठी त्यांनी गोरखचिंचेच्या बऱ्याच जुन्या आणि महाकाय वृक्षांचे निरीक्षण केले होते. त्यांनी पाहिलेल्या एका गोरखचिंचेच्या वृक्षाचे वयोमान पाच हजार वर्षे असल्याचे मत त्यांनी मांडले होते. आफ्रिकेतल्या बऱ्याच राज्यांत हे वृक्ष पूर्वापार पाहायला मिळतात. आफ्रिका आणि आशिया अशा दोन खंडांच्या परिसरात सागरी पाण्यानी वेढलेल्या मादागास्कर देशात गोरखचिंचेच्या लक्षणीय वृक्षांचे दर्शन घडते. मुळचा आफ्रिकेतल्या या वृक्षाची रोपे भारतात येताना अरब प्रवाशांनी आणली आणि इथल्या प्रदेशात त्यांनी लावली, असे मानले जाते . त्यामुळे भारतातल्या (India) बऱ्याच ठिकाणी हा वृक्ष आढळतो . पानझडीचा हा वृक्ष असून,हिवाळ्यात त्याची पाने गळून पडतात .

भारतातल्या व्यापार आणि उद्योग यांच्याशी निगडीत जलमार्गाने जोडलेल्या बंदरांशी संलग्न शहरात ही झाडे पहायला मिळतात भारतातील सर्वाधिक गोरखचिंच वृक्षांची संख्या मध्यप्रदेशातल्या मालवा प्रांतातल्या पंधराव्या शतकातील ऐतिहासिक जहाज महलासाठी प्रसिद्ध मंडु शहरात असून, येथील भिल्ल आदिवासी जमातीसाठी या वृक्षाचे महाकाय फळ, व्हिटामिन सी चा आणि खाद्यान्न तसेचऔषधाचा महत्त्वपूर्ण स्त्रोत ठरलेला आहे. या पिकलेल्या फळातील उपलब्ध मगज या आंबट पदार्थापासून, सुकवून जी पावडर तयार केली जाते, तिचा वापर आरोग्यदायी आणि मधुर शितपेये तयार करण्यासाठी केला जातो.

या फळांची पावडर आणि अन्य पदार्थांची विक्री, आदिवासी जमातीच्या उदर निर्वाहासाठी सहाय्यक ठरलेली आहे. मंडु येथील जहाज महाल या ऐतिहासिक वास्तुचे दर्शन घेण्यासाठी जाताना, बाहेर आदिवासी जमातीतील व्यक्ती गोरखचिंचेच्या फळांपासून तयार बऱ्याच घटकांची विक्री करण्यास बसलेले असतात. गोरखचिंचेचे येथील महावृक्षांचे वैभव, मंडु शहराची शान ठरलेली असून, मध्य प्रदेश सरकारने त्यांना भौगोलिक मानांकन मिळवण्यात यश मिळवलेले आहे.

गोव्यात गोरखचिंच वृक्ष, पेडणेतील मोरजी, बार्देसातील मांडवी किनाऱ्यावरच्या बेती, तिसवाडीतील काबो राज निवास, केपे शहरातील पोलिस स्थानक अशा मोक्याच्या ठिकाणी पहायला मिळतात . मोरजी येथील गोरखचिंचेच्या महाकाय फळांच्या बाहेरच्या आवरणापासून कमंडलुची निर्मिती केली होती पेडणेत हा एकमेव गोरखचिंचेचा वृक्ष असल्याने, त्याचे दर्शन घेण्यासाठी वृक्षप्रेमी हमखास इथे यायचे.

पाव शतकापूर्वी गोव्यातील सर्वाधिक १३ गोरखचिंच वृक्ष आगशी जवळच्या सुलाभाटी तलावाच्या परिसरात पहायला मिळत होते. आज त्यातले काही मोजकेच वृक्ष, सुलाभाटीचे लोकदैवत असणाऱ्या साखळ्योच्या परिसरात शिल्लक राहिलेले पहायला मिळतात. साखळ्यो हे लोकदैवत इथल्या कष्टकरी जातीजमातींचा रक्षणकर्ता असून, त्याच्यामुळेच गोरखचिंच आणि अन्य वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन झालेले पहायला मिळते. सुलाभाटीचा विस्तीर्ण तलाव आणि त्या परिसरात असलेले गोरखचिंचेचे महावृक्ष गोवा कदंब राजवटीत नावारुपास आलेल्या गोपकपट्टणम् बंदर, तेथील अधिष्ठात्री असणारी चांमुडेश्वरी देवी आणि त्यानंतर घडलेल्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. या वृक्षांविषयी येथील गावडा आदिवासी जमातीबरोबर अन्य कष्टकरी जमातीत एकेकाळी पर्यावरणीय आणि सांस्कृतिक अनुबंध होते, परंतु आज गृहनिर्माण वसाहती, नवनवीन इमारतींचे होणारी बांधकामे आणि सिमेंट काँक्रिटीकरणाच्या अराजक विस्तारामुळे या परिसराचे मानदंड ठरलेले हे महावृक्ष झपाट्याने विस्मृतीत जात आहेत.

आगशी परिसरातील सुलाभाटीचा तलाव ही एकेकाळी देश विदेशातल्या पक्षांना आकर्षित करणारी पाणथळीची आश्वासक अशी जागा होती. हिवाळ्यात या तलावाच्या पाण्याचा भाजीपाला आणि अन्य लागवडीला जलसिंचन सुविधा पुरवण्यासाठी स्थानिक कष्टकरी करायचे आणि त्यामुळे येथील साखळ्यो देव आणि त्याच्या परिसरातले गोरखचिंचेचे महावृक्ष त्यांच्यासाठी महत्त्वाचे साथीदार होते.

ऋतुमानानुसार या वृक्षांचे बदलणारे रूप डोळ्यांत साठवत, इथला समाज माती, संस्कृती आणि लोकधर्माशी स्नेहबंध राखून, जीवन जगत होता. आज हे दुवे आधुनिक तंत्रज्ञान आणि विकास यांच्या गतिमानतेत कुठेतरी हरवत चालला आहे आणि त्यामुळे या वैशिष्टयपूर्ण वृक्षांचे विस्मरण होऊन, स्थानिक समाज दूर जाऊ लागला आहे. गोरखचिंचेच्या या महावृक्षांनी सुलाभाटीच्या परिसराला लाभलेल्या जैविक संपदेच्या वैविध्यपूर्ण वारश्याच्या अनमोल संचितांत भर घालण्याचे योगदान केले होते. परंतु आज त्यांचे विस्मरण ही खरीतरी दुखरी नस ठरलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT