Chhaava Movie  Dainik Gomantak
मनरिजवण

Chhaava Advance Booking: 'छावा'च्या प्रदर्शनाला चार दिवस बाकी, ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात; किंमत किती?

Chhaava Movie Release: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे

Akshata Chhatre

Chhaava Movie Release: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. विकी कौशल हा हिंदी सिनेमातील रांगडा अभिनेता या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसेल तर दक्षिणेतून सिनेसृष्टीमधे पदार्पण केलेली रश्मिका मंदाना हिने या चित्रपटामध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. विकी आणि रश्मिका यांच्याव्यतिरिक्त अक्षय खन्ना देखील प्रमुख भूमिकेत आहे, तो चित्रपटात बादशाह औरंगजेबाची भूमिका निभावताना पाहायला मिळेल.

ऑनलाईन विक्री सुरु:

मराठी माणसाच्या मनात छावा या चित्रपटाची उत्सुकता आहेच. महाराजांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा लागून राहिली आहे. सध्या आगामी चित्रपटाचे ऑनलाईन बुकिंग सुरु झाले असून बुक माय शो सारख्या प्लॅटफॉर्म्सवर चित्रपटाची तिकिटं ३०० ते ३५० रुपयांना विकली जातायत.

सकाळी सकाळी चित्रपट पाहायला जाणं स्वस्त असतं असं म्हणतात पण या चित्रपटाच्या बाबतीत तसं वाटत नाही. छावा सिनेमाच्या सकाळी लागणाऱ्या शोचं तिकीट देखील २०० ते ४०० रुपये किंमतीच्या रेंजमध्ये आहे. PVR,INOX यांसारख्या बड्या स्क्रीन्सवर तर चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ४५० ते ५०० पर्यंत जाऊन पोहोचली आहे .

Imax मध्ये दिसणार 'छावा':

चित्रपट प्रेमींसाठी बड्या स्क्रीन्सवर चित्रपट पाहणं म्हणजे पर्वणी असते आणि छावाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वीच चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. छावाच्या चाहत्यांना हा चित्रपट Imax मध्ये पाहायला मिळणार आहे, मात्र यासाठी ६०० ते ७०० रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागेल लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा बॉक्स ऑफिसवर किती धुमाकुळ घालतो हे पाहणं रंजक ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT