Akshata Chhatre
विकी कौशलचा चित्रपट येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अनेकांची उत्कंठा ताणून धरण्यात यशस्वी ठरलाय.
या चित्रपटाचा ट्रेलर आजच प्रदर्शित झालाय, ज्यात प्रमुख भूमिकेत रश्मिका मंदाना, विकी कौशल आणि अक्षय खन्ना दिसतायत.
विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत.
दक्षिणी अभिनेत्री रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळतेय.
लक्ष्मण ऊटेकर यांचे दिग्दर्शन तर दिनेश विजन या चित्रपटाचे निर्माते आहेत.
सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर रेहमान यांचे संगीत आणि सौरभ गोस्वामी यांच्या सिनेमेट्रोग्राफीसह हा चित्रपट हिंदी भाषेत १४ फेब्रुवारीच्या दिवशी प्रदर्शित होईल.