बॉबी देओलने 2024 मध्ये ज्या चित्रपटातून पुन्हा एकदा पदार्पण केले तो चित्रपट होता- कंगूवा. दाक्षिणात्य सुपरस्टार 'सूर्या'च्या या चित्रपटात त्याने खूंखार खलनायकाची भूमिका साकारली, ज्याचे नाव उधीरन होते. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निर्मात्यांना खूप ट्रोल करण्यात आले. त्यामागचे कारण होते लाऊड बॅकग्राउंड आणि हिंदी डबिंग. याशिवाय, अशा अनेक चुका झाल्या, ज्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. दरम्यान, सूर्याच्या या चित्रपटाने एक मोठी उपलब्धी मिळवली आहे.
323 जागतिक चित्रपटांना टक्कर देत 'कंगूवा'ने बेस्ट पिक्चर रिमांइडर लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. वास्तविक, ऑस्करच्या (Oscar) अधिकृत साइटवर एक लिस्ट जारी करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये इतर अनेक भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. ज्यामध्ये पृथ्वीराज सुकुमारन यांचा 'गोट लाइफ', तसेच, मंकी मॅन आणि संतोष यांचा समावेश आहे.
खरं तर, 'कंगूवा' बीग बजेटमध्ये बनवण्यात आला होता. हा चित्रपट (Movie) एक एपिक फॅंटसी अॅडव्हेंचर चित्रपचट आहे, ज्याचे दिग्दर्शन सिरुथाई शिवा यांनी केले होते. तामिळ सुपरस्टार सूर्याने 2 वर्षांच्या ब्रेकनंतर या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले होते. बॉबी देओल चित्रपटात खलनायक बनला, जो सेंकड हापमध्ये एन्ट्री करतो. मात्र, सिनेरसिकांना हा चित्रपट प्रभावित करु शकला नाही आणि फ्लॉप ठरला. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर या चित्रपटाला ऑस्कर 2025 मध्ये एन्ट्री मिळाली आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या रिमाइंडरच्या लिस्टमध्ये 'कंगूवा'ने स्थान मिळवले, ही स्वतःतच मोठी उपलब्धी आहे. गेल्या महिन्यातच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. तुम्ही Amazon Prime Video वर देखील पाहू शकता. 14 नोव्हेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचा परफॉर्मन्स फारसा चांगला राहिला नाही. 350 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 106.25 कोटींची कमाई केली होती.
फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालन यांनी X (पूर्वी ट्विटर) वर ही लिस्ट शेअर केली आहे. यावर चाहत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. थिएटरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद असूनही, ऑस्कर 2025 मध्ये कंगूवाची एन्ट्री झाल्यामुळे चाहते आनंदी आहेत. याशिवाय, काही लोक म्हणतायेत की, हे मीम्ससाठी चांगले आहे, परंतु हे खरे असू शकत नाही. विशेषत: सूर्याचे चाहते त्याच्यासाठी खूप खूश आहेत. बॉबी देओलचाही हा पहिला साऊथ चित्रपट आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट ऑस्करपर्यंत पोहोचणे ही मोठी कामगिरी आहे. कंगूवाशिवाय गॉट लाईफनेही आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन यांनी जबरदस्त अभिनय केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.