Chhaava Movie: फक्त मराठीच नाही तर देश विदेशातील जनतेच्या पसंतीस पडलेला छावा वेगवेगळ्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असतो. या चित्रपटात रायाजीची भूमिका साकारलेला संतोष जुवेकर मात्र भलताच चर्चेचा विषय ठरतोय. खरंतर चित्रपटातील भूमिकेने त्याने प्रेक्षकांना जिंकून घेतलंच पण सध्या तो त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. एका मुलाखतीत संतोष जुवेकरने या चित्रपटात औरंगजेबची भूमिका साकारलेल्या अक्षय खन्नावर केलेल्या एका वक्तव्यामुळे नेटकरी जुवेकरवर तुटून पडले आहेत.
खरंतर संतोष जुवेकरने एका मुलाखतीत त्याने छावाच्या चित्रीकरणावेळी अक्षय खन्ना सोबत एकही शब्द न बोलल्याचा खुलासा केला. "चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी मी मुघल पात्र साकारणाऱ्या कुठल्याही व्यक्तीसोबत बोललो नाही " असं संतोष म्हणाला होता.
असंच एकदा तो चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना भेटायला गेला असता, तिथे शेजारी अक्षय खन्ना बसला होता, उतेकरांनी त्याला याची जाणीव करून दिली मात्र तो अक्षय खन्ना सोबत एक शब्द देखील बोलला नाही. "माझा अक्षय खन्नावर राग नाही, त्याने उत्तम अभिनय केलाय, पण त्याच्याशी बोलावं असं वाटलं नाही" असं संतोष म्हणाला होत.
मात्र संतोषच्या या वाक्यावरून नेटकरी त्याच्यावर तुटून पडले आहेत. फेसबुकवर अक्षय खन्नाच्या चाहत्यांकडून जुवेकरला पूर्णपणे घेरलंय. एकाने संतोष जुवेकर न बोलल्यामुळे औरंगजेब दवाखान्यात असल्याचं मिम पोस्ट केलंय. काहीजणं अक्षय खन्नाचा चित्रपटातील डायलॉग वापरून म्हणतायत की "संतोष माझ्याशी बोल, माझं करियर खराब होईल".
१४ फेब्रुवारीच्या दिवशी प्रदर्शित झालेला छावा अजूनही तेवढ्याच दमाने कमाई करतोय. छावाने आतापर्यंत ४०० कोटींचा आकडा पार केलाय आणि लवकरच ५०० कोटींच्या गटात एंट्री करण्याच्या तयारीत आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाला सिनेप्रेमींचे भरभरून प्रेम मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.