pankaj dheer death Dainik Gomantak
मनरिजवण

Pankaj Dheer: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

Pankaj Dheer Passed Away: हिंदी चित्रपटसृष्टी आणि टीव्हीवरील प्रेक्षकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने खास ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले

Akshata Chhatre

Pankaj Dheer death news: हिंदी चित्रपटसृष्टी आणि टीव्हीवरील प्रेक्षकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने खास ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते. मुंबईत १५ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते आणि उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी ही जीवन लढाई गमावली. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण सिनेसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

बी.आर. चोप्रांच्या 'महाभारता'मुळे मिळाली ओळख

पंकज धीर यांना दूरदर्शनवर प्रदर्शित झालेल्या बी.आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या 'महाभारत' मालिकेत 'कर्ण' यांची प्रतिष्ठित भूमिका साकारल्यामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांचा तेजस्वी अभिनय आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे. दूरचित्रवाणी मालिकांसोबतच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही अभिनेता म्हणून काम केले होते.

'अर्जुना'ने दिला दुःखद बातमीला दुजोरा

पंकज धीर यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचे जवळचे मित्र आणि 'महाभारत' मालिकेत 'अर्जुन' यांची भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान यांनी दुजोरा दिला आहे. पंकज यांची प्रकृती कर्करोगामुळे अत्यंत नाजूक बनली होती आणि उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. आपल्या मित्राच्या जाण्याने फिरोज खान यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या मित्राला निरोप दिला. फिरोज खान यांनी लिहिले आहे की, "अलविदा माझ्या मित्रा! आम्ही तुला खूप मिस करू."

सिनेसृष्टीला मोठा धक्का

पंकज धीर यांचे अचानक निघून जाणे हे चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी एक मोठे नुकसान मानले जात आहे. त्यांनी अनेक पिढ्यांच्या प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाने स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर पंकज धीर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'कर्ण' म्हणून त्यांनी दिलेले योगदान भारतीय मनोरंजन विश्वात कायम स्मरणात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT