Goa restaurant Dainik Gomantak
मनरिजवण

Amruta Arora Goa Restaurant: मलायका अरोराच्या बहिणीने गोव्यात सुरु केलं रेस्टॉरंट; सोशल मीडियावर पोस्ट करून दिली खुशखबर!!

Jolene Restaurant Goa: गोव्यातील हणजूण समुद्र किनाऱ्यावर उभं असलेल्या या हॉटेलला जोलेन असे नाव देण्यात आलेय

Akshata Chhatre

Goa Restaurant Opening: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराने मुंबईत काही दिवसांपूर्वी एक हॉटेल सुरु केलं होतं आणि त्यानंतर आता तिची बहीण अमृता अरोरा हिने देखील पतीच्या सोबत एका नवीन हॉटेलची सुरुवात केलीये. गोव्यातील हणजूण समुद्र किनाऱ्यावर उभं असलेल्या या हॉटेलला जोलेन असे नाव देण्यात आलेय.

पती शकील लडाखच्या सोबतीने अमृता या नवीन व्यव्यसायाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. किनारी हॉटेल्सचं पर्यटकांना भारीच आकर्षण असतं, आणि त्यात अमृता आणि शकील यांनी सुरु केलेलं हे नवीन रेस्टोरंट बीचसाईड व्हिवचा अनोखा अनुभव देणार आहे.

गोव्यातील किनाऱ्यांवर उभ्या असलेल्या अनेक बड्या हॉटेल्सपैकी एक म्हणून अमृताचं जोलेन देखील ओळखलं जातंय. अमृताने हॉटेलमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ, इंटेरियर डिझायन आणि कॉकटेल्स सारखी महत्वाची माहिती सादर केलीये.

अमृता हिने स्वतःच्या खासगी अकाउंट वरून या नवीन हॉटेलचा फोटो शेअर केलाय, तसंच या हॉटेलच्या नावे सुरु केलेल्या इंस्टाग्राम पेजवर हॉटेलच्या संबंधित आणखीन माहिती पाहायला मिळते.

गोव्यातील निसर्गाचा अनुभव पर्यटकांना घेता यावा अशाप्रकारे इथे सजावट केली गेली आहे. पानांचा वापर करून बनवलेला अँबियन्स खरोखर लक्षणीय आहे. अमृताने या हॉटेलमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांना काही आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांसह जोडलंय ज्यामुळे तयार होणारी अनोखी रेसिपी या नवख्या हॉटेलचं आकर्षण ठरली आहे. अमृताच्या या हॉटेलचे प्रमुख शेफ सुवीर सरन आहेत ज्यांना भारतातील प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांच्यासोबत देखील काम करण्याचा अनुभव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

SCROLL FOR NEXT