Manoj Kumar Death Dainik Gomantak
मनरिजवण

Manoj Kumar Passed Away: 'भारत का रहने वाला हूँ....', दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

Actor Manoj Kumar Death: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Pramod Yadav

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील कोकीळाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात शुक्रवारी (०४ एप्रिल) पहाटे ४.०३ वा. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभक्तीपर सिनेमांमधील त्यांच्या भूमिकांमुळे 'भारत कुमार' अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

एएनआय या वृत्तसंस्थेने मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केल्याचे म्हटले आहे.

"दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री मनोज कुमार जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आयकॉन होते. मनोज कुमार त्यांच्या देशभक्तीपर भूमिकांसाठी लक्षात ठेवले जातील. मनोज जी यांच्या कार्यांनी राष्ट्राभिमानाची भावना प्रज्वलित केली आणि पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखाच्या प्रसंगी माझे सद्भावना त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्या सोबत आहेत. ओम शांती", अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोज कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शहीद, उपकार, रंग दे बंसती यासारख्या सिनेमातील देशभक्तीपर भूमिकांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाशिवाय उत्तम दिग्दर्शक म्हणून देखील त्यांची ख्याती होती. मनोज कुमार यांच्या नावावर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर आहेत. सिनेमातील योगदानासाठी १९९२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच, २०१५ साली त्यांना मानाचा दादसाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT