गेल्या काही दिवसांपासून किरण राव यांच्या लापता लेडीज चित्रपटाला ऑस्कर मिळेल अशी अपेक्षा बाळगली जात होती. एखादा भारतीय चित्रपटाला ऑस्कर सारखा मोठा पुरस्कार मिळणं ही फक्त सिनेसृष्टीसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब ठरली असती, पण आता लापता लेडीज हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने सर्वजण हिरमुसले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने ही घोषणा केल्याने भारताचं 'लापता लेडीज' साठी ऑस्कर मिळवण्याचं स्वप्न भंगलं आहे.
भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेलेला लापता लेडीज हा चित्रपट ऑस्करच्या १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही. आता १५ चित्रपटांमध्ये ऑस्करसाठी स्पर्धा रंगेल आणि यांपैकी एका चित्रपटाला ऑस्कर या सर्वोत्तम पुरस्काराने सन्मानित केलं जाईल.
खरं तर भारताकडून लापता लेडीजसह आणखीन २९ चित्रपट पाठवण्यात आले होते ज्यांमध्ये रणबीर कपूरचा ऍनिमल तसेच चंदू चॅम्पियन,आट्टम यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता. समितीने मात्र लापता लेडीजची निवड केली होती. या चित्रपटामध्ये नितांशी गोयल, प्रतिभा रांता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम, रवी किशन, गीता अग्रवाल शर्मा अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या.
लापता लेडीज जरी बाहेर पडला असला तरीही गुनीत मोंगा कपूर यांची अनुजा हा लघुपट शॉर्टलिस्ट झाला आहे. हा लघुपट बालमजुरीवर भाष्य करतो. तसेच भारत आणि ब्रिटन यांची सहनिर्मिती असलेला संतोष हा चित्रपट देखील शॉर्टलिस्ट झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.