Kiran Juneja Youth and Cinema Empowering Aspirants for a Creative Future Master Class At IFFI 2024
इफ्फीमधील मास्टर क्लासमध्ये ‘युथ अँड सिनेमा : एम्पॉवरिंग अस्पीरेंट्स फॉर क्रिएटिव्ह फ्युचर’ आणि ‘फॅशन फॉर परफेक्शन: रमेश सिप्पीज फिलॉसॉफी’ या दोन विषयावर लागोपाठ दोन सत्रे घडली. त्यापैकी पहिल्या सत्रात अभिनेत्री किरण जुनेजा सिप्पी यांनी त्यांच्या सिनेमा क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगताना आजच्या युवकांनी या क्षेत्रात प्रवेश करताना कुठले भान राखणे आवश्यक आहे हे सांगितले.
एक काळ होता ज्यावेळी कुठलेही आई-वडील आपल्या मुलांना चित्रपट क्षेत्रात जाण्यासाठी उत्तेजन देत नव्हते. हे वातावरण बदलण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत होतो आणि त्याचा परिणाम म्हणून आज ते वातावरण बदलताना दिसते आहे. आपल्या मुलांना फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळावा म्हणून आईवडील आज त्यांना घेऊन येताना दिसतात.
एक काळ होता ज्यावेळी देशात सिनेमाचे शिक्षण देणारी एफटीआय ही एकच संस्था होती, त्यामुळे अवघे विद्यार्थीच सिनेमाचे शिक्षण घेऊ शकत होते. आज मात्र आपल्या देशात सिनेमाचे शिक्षण देणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्यातून सिनेमाचे पायाभूत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी सिनेमा क्षेत्रात प्रवेश करत आहेत.
मी अभिनयाचे कुठलेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते, त्यामुळे माझा या क्षेत्रात प्रवेश सोपा नव्हता. माझ्याकडे प्रतिभा होती पण कौशल्य नव्हते. मी काम करत असताना शिकत गेले. कला क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्याकडे सर्वप्रथम प्रतिभा असणे गरजेचे आहे. प्रतिभा ही अशी बाब आहे जी कुणी निर्माण करू शकत नाही मात्र त्या क्षेत्रातले कौशल्य शिकून प्रतिभावंताला विकसित कलाकार बनणे शक्य आहे. कलाकार म्हणून घडत असताना प्रतिभावंतकडे संयम असणे खूप महत्त्वाचे आहे.
सिनेमा क्षेत्रात येणारे आजचे तरुण खूप सुदैवी आहे कारण ते प्रथम शिक्षण घेतात आणि नंतर ते या क्षेत्रात येतात. अर्थात शिक्षण घेतले म्हणून प्रत्येक जण या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो असे नाही कारण हे शिक्षण ते पुढे कसे घेऊन जातात यावर खूप काही अवलंबून असते. या क्षेत्रात काम करण्याचा महत्त्वाचा निकष म्हणजे न घाबरता आपल्याला पुढे जायचे आहे हे आपण ओळखायला हवे. सारे जण शाहरुख किंवा सलमान यांच्यासारखे स्टार बनू शकणार नाही परंतु ‘प्रतिभा’ नेहमीच आपल्या पाठीशी आहे याची जाणीव ठेवून कामा करत राहणे महत्वाचे आहे.
अनेक प्रतिभावंताना ‘टाईम लाईन’चे भान नसते. ती त्यांची एक मोठी समस्या आहे म्हणून वेळेचे व्यवस्थापन करायला त्यांनी शिकले पाहिजे. काळ कोणासाठी थांबत नाही तेव्हा योग्य काळात आपण आपली निर्मिती पूर्णत्वाला कशी नेऊ शकतो याकडे लक्ष द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.