Bollywood actor in Goa Dainik Gomantak
मनरिजवण

John Abraham in Goa: बॉलीवूडचा हार्टथ्रोब अभिनेता जॉन अब्राहम गोव्यात; पर्वरीत करणार NoMoZo महोत्सवाचे उद्घाटन

NoMoZo Event Opening Goa: बॉलीवूडचा हार्टथ्रोब अभिनेता जॉन अब्राहम रविवारी ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४:३० वाजता NoMoZo महोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहे

Akshata Chhatre

पर्वरी: बॉलीवूडचा हार्टथ्रोब अभिनेता जॉन अब्राहम रविवारी ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४:३० वाजता NoMoZo महोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहे. NoMoZo महोत्सवाची सुरुवात गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी वर्ष २०१७मध्ये केली होती. या कार्यक्रमामधून फिटनेस, गोव्याची संस्कृती, नवीन उपक्रम आणि स्थानिक कला यांचे मिश्रण पाहायला मिळते.

या वर्षीच्या आवृत्तीत १२ वेगळ्या झोनचा सहभाग करण्यात आला आहे. फेस्टिव्हलला जाणारी लोकं हेरिटेज झोन एक्सप्लोर करू शकतात, आयटी आणि सायन्स झोनमध्ये भविष्याचा वेध घेऊ शकतात, तसेच ऍस्ट्रॉनॉमिमधून ताऱ्यांचे चित्र पाहू शकतात.

इतर झोनमध्ये युवा, फिटनेस, बॉक्सिंग, मार्शल आर्ट्स, आरोग्य, कला आणि नृत्य यासह विविध उपक्रमांचा समावेश असेल. या उत्सवात समाविष्ट असलेल्या वेगवेगळ्या झोनमधून विविध वयोगटातील लोकांना आकर्षित केलं जाईल.

महोत्सवाचे मुख्य संयोजक निनिल डिसोझा यांनी NoMoZo या कार्यक्रमातील उपक्रमांवर चर्चा केली. या कार्यक्रमाची प्रत्येक आवृत्ती काहीतरी नवीन घेऊन येते असं डिसोझा म्हणाल्या आणि या कर्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक समुदाय, गोव्याचे रहिवासी आणि पर्यटकांना एक अद्वितीय अनुभव देण्याचे वचन त्यांनी दिलं. या कार्यक्रमात आकर्षक झोनच्या पलीकडे, स्थानिक पाककृती, हस्तनिर्मित कलाकुसर आणि पर्यावरणपूरक उत्पादने असलेली ५० हून अधिक दुकानं मांडली जाणार आहेत, ज्यामुळे व्यवसायिकांना ग्राहकांशी थेट संपर्क साधण्यास मदत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, लोक ओक्साबोक्शी रडले; रवींच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू, सहा दिवसांसाठी मुख्यमंत्री ते गोव्याच्या राजकारणाचे 'कर्णधार'; 'रवी नाईक' यांची अनोखी कहाणी!

Viral Video: डोनाल्ड ट्रम्प माझे पप्पा...! राखी सावंतचा ट्रम्प कनेक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ, नेटकरी म्हणाले, "अमेरिकेची पुढची प्रेसिडेंट राखी ट्रम्प"

अरे हिरो...! रोहित शर्मा नवीन कर्णधार शुभमन गिलला पहिल्या भेटीत काय म्हणाला? विराट कोहलीला गाडीत बसलेलं पाहिलं अन्... Video Viral

Davorlim Panchayat: ''भाजपचं गलिच्छ राजकारण चाललंय'', शेवटच्या क्षणी पंचायत निवडणूक रद्द! दवर्ली पंचायतीत हाय व्होल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT