India International Music Week Dainik Gomantak
मनरिजवण

India International Music Week: गोव्यात उद्यापासून 'इंडिया इंटरनॅशनल म्युझिक वीक 2025 ची सुरुवात; 30 हून अधिक देशातील कलाकार लावणार हजेरी

India International Music Week 2025: गोव्यात 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या 'इंडिया इंटरनॅशनल म्युझिक वीक- २०२५'मध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार आपली प्रतिभा सादर करताना दिसतील.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या 'इंडिया इंटरनॅशनल म्युझिक वीक- २०२५'मध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार आपली प्रतिभा सादर करताना दिसतील. ‘इंडिया म्युझिक एक्सचेंज’च्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम दक्षिण आशियातील अशा प्रकारचा पहिलाच संगीत महोत्सव आहे. या महोत्सवात 30 पेक्षा अधिक देशांमधील कलाकार आणि संगीत उद्योगातील व्यवसायिक सहभागी झाले आहेत. रेकॉर्ड लेबल कंपनी, संगीत प्रेमी, समविचारी कलाकार यांच्यासाठी हा एक अभूतपूर्व जागतिक संगीत मेळावा आहे. 

4 फेब्रुवारी रोजी रॉक पूल (W हॉटेल, वागातोर) येथे या महोत्सवाला सुरुवात होईल.‌ आशियाई इलेक्ट्रॉनिका प्रवर्तक ताल्विन सिंग, शिलॉंग येथील ब्लूज संगीतकार तिप्रीती खरबंगार आणि गोव्याचे (Goa) आवडता ‘रोझ आंगोण बँड’ हे या महोत्सवाचे उद्घाटनीय सादरकर्ते असतील. 

5 आणि 6 फेब्रुवारीला हणजूणे येथील 'द वेस्टीन गोवा' मध्ये होणाऱ्या ट्रेड कॉन्फरन्स, पॅनल चर्चा यामध्ये देशोदेशीचे कलाकार, उद्योग व्यवसायिक, आणि संगीत प्रेमींचा सहभाग असेल.. या दोन्ही दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर भारत तसेच जगभरातील उदयोन्मुख कलाकार ‘इको’, वागातोर येथे सादरीकरण करतील.‌ अर्थात त्यांचे संगीतही जागतिक दर्जाचे असेल यात शंका नाही. त्यानंतर रात्री उशिरा वामोस, वागातोर येथील इनडोअर जागेत वेगळ्या प्रकारच्या झपाटलेल्या संगीत वातावरणाचा अनुभव संगीत प्रेमीं घेतील. 

इंडिया इंटरनॅशनल म्युझिक वीक- २०२५ मधील कलाकार

अनुष्का मस्के- भारत, ब्रात्री- झेक प्रजासत्ताक, कॅरिसा- भारत, फरहान रहमान- भारत, हमजा रहमतुल्ला अँड राजस्थान फोकस्टार्स- भारत, जटायु- भारत, किमॅन लॉ- ऑस्ट्रिया, मॅड बॉय/ मिंक- भारत, मदर्स केक –ऑस्ट्रिया, नाझ- नेदरलँड, 0x7 जेन- भारत, रफिकी- भारत, शांका ट्राईब- भारत, रोजा सेसिलिया-इंग्लंड, शांतम- भारत, स्टॅलवर्ट- भारत, ट्रेसी डि सा- फ्रान्स, त्सुम्योकी गोवा- भार

या महोत्सवात आधुनिक हीप हॉपला अद्वितीय सांस्कृतिक प्रभावांचे मिश्रण करून मंचावरून सादर करणारा गोव्याचा रॅपर हीप पॉप नॅथन मेंडीस उर्फ त्सुमोकी आणि १९६०-७० या दशकातील लोकप्रिय कोकणी गीते सादर करणारा ‘रोझ अंगोण बँड’ यांचा समावेश आहे. रोझ अंगोण बँड गोव्याचे पारंपारिक आणि आधुनिक संगीत यांचा कमालीचा मिलाफ आपल्या सादरीकरणात करत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT