Annamalai IFFI 2025 Dainik Gomantak
मनरिजवण

IFFI 2025: 'पर्रीकरांनी हा महोत्सव गोव्यात आणला ही मोठी भाग्याची गोष्ट', तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे गौरवोद्गार

K Annamalai IFFI 2025: इफ्फी’ दरवर्षी आपली प्रतिष्ठा अधिक उंचावत आहे. भारतीय आणि जागतिक सिनेविश्वाला जोडणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक पूल म्हणून आपला झेंडा उंच ठेवत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

इफ्फी’ दरवर्षी आपली प्रतिष्ठा अधिक उंचावत आहे. भारतीय आणि जागतिक सिनेविश्वाला जोडणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक पूल म्हणून आपला झेंडा उंच ठेवत आहे. ‘इफ्फी’मध्ये विशेषत: लहान पण हृदयस्पर्शी चित्रपटांना चांगली संधी दिली जाते आणि त्यातून सादर झालेल्या कथांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. भारतीय कथांचा सन्मान करणे आणि जागतिक पातळीवर नेण्याच्या योगदानाची प्रशंसा ‘इफ्फी’च्या भेटीदरम्यान तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केली.

गोव्यात ‘इफ्फी’ आणण्यामध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे योगदान त्यांनी आवर्जून अधोरेखित केले. अण्णामलाई म्हणाले की, इफ्फीला भेट देताना मला अत्यंत आनंद होत आहे.

गेली २१ वर्षे या महोत्सवाने गोव्याला आंतरराष्ट्रीय नकाशावर अधोरेखित केले आहे. त्यांनी पर्रीकरांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, मनोहर पर्रीकरांनी हा महोत्सव गोव्यात आणला ही गोव्याची मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि ‘इफ्फी’ आता येथे कायमस्वरूपी स्थिरावला आहे.

अण्णामलाई यांनी महोत्सवाच्या बदलत्या स्वरूपाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, मोठ्या बजेटच्या चित्रपटांसोबत देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लहान चित्रपटांना मिळणारा व्यासपीठ म्हणजे कलाकारांचा विजयच आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘इफ्फी’ लघुपटांना, प्रदेशातील चित्रपटांना मोठी संधी देत आहे. केवळ ‘ब्लॉकबस्टर’च नाही, तर भारताचा आत्मा असलेल्या छोट्या चित्रपटांनाही येथे मान मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...अन् सर्वजण आकाशाकडेच पाहत राहिले! क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही; चाहत्यांनी पाहिला अद्भुत नजारा Watch Video

Ganesh Idol Sellers Registration: गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ, पर्यावरण विभागाकडून संकेतस्थळ सुरू ठेवण्याचे निर्देश

Agniveer New Rules: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! वीरमरण आल्यास कुटुंबाला पेन्शन किंवा नोकरी देण्याची तयारी; लवकरच नियमात होणार बदल

Goa Karnataka Water Dispute: म्हादईनंतर आता तिळारीच्या पाण्यावरही कर्नाटकाची नजर; गोव्याच्या जलहक्कांसमोर नवे संकट, सत्ताधारी-विरोधक मात्र शांतच!

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटामागे 'अल-कायदा'! UNच्या अहवालातून मोठा खुलासा; 'जैश'चे नाव पुढे करुन खेळला खतरनाक खेळ

SCROLL FOR NEXT