Tiatr artist goa Dainik Gomantak
मनरिजवण

Tiatr Season: गोव्यात ईस्टरपासून सुरू होतोय 'तियात्रांचा' दुसरा हंगाम, तालमींना जोरात सुरुवात

Goan Tiatr: तियात्रीस्ट (तियात्र सादर करणारे) या दोन्ही हंगामात आपले वेगवेगळे दोन तियात्र वर्षभरात सादर करत असतात.

Sameer Panditrao

गोमंतकीय तियात्रांचे दोन हंगाम असतात. पहिला हंगाम पावसाळ्यानंतर, ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालतो तर दुसरा हंगाम लेंटनंतरच्या काळात (ईस्टरनंतर) एप्रिलमध्ये सुरू होतो. हा दूसरा छोटा हंगाम पावसाळा सुरू होईपर्यंत चालू राहतो.

तियात्रीस्ट (तियात्र सादर करणारे) या दोन्ही हंगामात आपले वेगवेगळे दोन तियात्र वर्षभरात सादर करत असतात. यंदा 20 एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या ईस्टरच्या मुहूर्तावर काही तियात्र दिग्दर्शकांचे नवीन तियात्र प्रदर्शित होणार आहेत तर इतर काही दिग्दर्शकांचे नवीन तियात्र मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हळूहळू प्रदर्शित होत राहतील.

सुप्रसिद्ध तियात्र लेखक-दिग्दर्शक प्रिन्स जेकब याचा ‘संसारान आसताना’, 100 पेक्षा अधिक तियात्र लिहून सादर करणारे दुसरे सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक रोजफर्न यांचा ‘दुदान साकर’, प्रसिद्ध कॉमेडियन आंबे यांचा ‘फातराच्या काळजाचो’, आयविस तावारीस यांचा ‘पिशें वो सांत’, पास्कोल द चिकालीम यांचा ‘आता आमचे किदे जातेले’, कॉमेडियन सेली यांचा ‘शिकोप नासलेलो’, कॉमेडियन जॉयल यांचा ‘मोजी सासूमाय’, पीटर रोशन यांचा ‘जवान’  हे तियात्र 20 एप्रिल रोजी ईस्टरच्या मुहूर्तावर प्रकाशित होत आहेत. 

याव्यतिरिक्त सुप्रसिद्ध विनोदवीर जॉन डिसिल्वा यांचा ‘मोगाळ’ (२१ एप्रिल), मार्टिन द पोंडा यांचा ‘आमची सोपना’ हे तियात्र एप्रिल महिन्याच्या पुढील दिवसात प्रदर्शित होत आहेत. 

तियात्रांमधील विनोदात विभत्सता शिरली आहे असा आरोप अलीकडच्या काळात होत असतो. परंतु प्रेक्षक अशा तियात्राना जातो ही देखील वस्तुस्थिती आहे. अर्थात माझ्यासारखे तियात्रिस्ट विभत्सतेपासून अंतर राखून आहेत हे देखील खरे आहे.‌ गेल्या हंगामामधील माझ्या तियात्राचे ७५ प्रयोग झाले ही बाबच तियात्रांचे प्रेक्षक काय पाहण्यासाठी उत्सुक असतात याचा दाखला आहे.

मी या क्षेत्रात गेली जवळजवळ ४० वर्षे काम करतो आहे. अनेक गैरसोयींचा सामना करत तियात्रिस्ट आपली कला गोव्यातील गावागावात सादर करत आले आहेत.‌ अलीकडच्या काळात तियात्रांचा दर्जा खालावला आहे या म्हणण्याला काही अर्थ नाही. अर्थात काही अपवादत्मक तियात्रांच्या बाबतीत ते खरे असेलही पण याचा परिणाम एकंदर तियात्र उद्योगावर झाला आहे असे मला वाटत नाही.   

- प्रिन्स जेकब, लेखक,दिग्दर्शक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT