Sobita Kudtarkar Dainik Gomantak
मनरिजवण

‘गोव्याच्या कथा चित्रपटामार्फत जगभर पोहोचत आहेत, याचे श्रेय तरुण दिग्दर्शकांना'; अभिनेत्री सोबिता कुडतरकर यांचे प्रतिपादन

Sobita Kudtarkar: ‘गोव्याच्या कथा चित्रपटामार्फत आज जगभर पोहोचत आहेत आणि याचे श्रेय तरुण दिग्दर्शकांना जाते’, असे अभिनेत्री सोबिता कुडतरकार चर्चासत्रात बोलताना म्हणाल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

‘गोव्याच्या कथा चित्रपटामार्फत आज जगभर पोहोचत आहेत आणि याचे श्रेय तरुण दिग्दर्शकांना जाते’, असे अभिनेत्री सोबिता कुडतरकार म्युझियम ऑफ गोवा, पिळर्ण येथे झालेल्या’ मोग सन्डे ‘ चर्चासत्रात बोलताना म्हणाल्या.

‘वाग्रो, लिला आणि स्ट्रेट अहेड  या कोकणी लघुपटांचे विशेष प्रदर्शन मोगमध्ये जाले. या लघुपटांच्या संदर्भात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्या उत्तरे देत होत्या. ‘गोव्यातील तरुणांचे दृष्टिकोन आता बदलले आहेत. त्यांच्या निर्मितींसाठी चित्रपट महोत्सव हे स्वप्न न राहता प्रत्यक्ष वास्तव बनले आहे’, असे त्या पुढे म्हणाल्या.

‘पूर्वी गोव्यातील चित्रपट निर्माते आपली निर्मिती इफ्फीत झळकेल याचे स्वप्न पहायचे पण आता ते त्यापलीकडे जाऊन रेनडान्स, टोरोन्टो आणि कान्ससारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महोत्सवांत आपले चित्रपट पाठवत आहेत. एका चित्रपटाने त्यांना दार दाखवले आणि त्या दारातून अनेकजण आत येऊ लागले आहेत’, असे त्या बोलताना पुढे म्हणाल्या.

स्वत:च्या दिग्दर्शकीय प्रवासाबद्दल देखील त्या या प्रसंगी बोलल्या, ‘मी चित्रपट निर्मितीचे औपचारिक घेतलेले नसले तरी, वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करत असताना त्यांच्याकडूनच खूप शिकले. एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन करणे अवघड असते पण ते आव्हान मला आवडते.’

कोंकणी चित्रपटांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्या म्हणाल्या, ‘कोकणी चित्रपटांना असणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्यांना असलेला स्थानिक प्रेक्षकांचा अभाव. जेव्हा प्रेक्षकच नाहीत, तेव्हा निर्माता त्यात पैसे का गुंतवणार?

म्हणूनच बरेच चित्रपट केवळ महोत्सवांत प्रदर्शित करण्यासाठी बनवले जातात. आपले प्रेक्षक, कलाकार, आणि गुंतवणूकदार हे मुळांसारखे आहेत. जेव्हा आपले लोक आपल्या कथेच्या मागे उभे राहतील तेव्हाच निर्माते आणि थिएटरही त्यांना साथ देतील.’

‘आज नवी पिढी गोव्याबाहेर जाऊन सिनेमाचं शिक्षण घेत आहे आणि परत येऊन कोंकणीतच चित्रपट बनवत आहे. आपल्या भाषेची आणि बोलींची ताकद जगभर पोहोचवायची असेल, तर आपल्यालाच तिचे मूळ होऊन उभे राहावे लागेल.’ असे त्या शेवटी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shivaji Maharaj Cavalry: राज्याभिषेकानंतर आई जिजाऊसाहेबांनी शिवरायांना आग्रहाने कृष्णा घोड्यावर बसवले होते; छत्रपतींचे समृद्ध घोडदळ

Goa Nightclub Fire: डान्स सुरू असतानाच भडकल्या ज्वाळा; हडफडे क्लबमधील दुर्घटनेचा थरार दर्शवणारा 'तो' Video Viral!

Konkani Word Etymology: ‘बाप’ हा शब्द सध्याच्या कुंळबी भाषेतील ‘आब’ या ‘वडील’ अर्थाच्या शब्दाचे रूप; कोकणी शब्दांचे कुरुंब मूळ

'CM सावंत राजीनामा द्या!', हडफडे दुर्घटनेनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला; सत्तेत राहण्याचा अधिकार नाही म्हणत दिला अल्टिमेटम

Goa Ritual Theatre: जेव्हा भक्ताच्या अंगात ‘भार’ येतो, तेव्हा तो सामान्य माणूस न राहता देवतेचे रूप घेतो, हेच मूळ 'विधीनाट्य'

SCROLL FOR NEXT