Waves Film Bazaar: खुशखबर! पणजीत भरणार आशियातील सर्वांत मोठा ‘वेव्हज फिल्म बाजार’; वाचा संपूर्ण माहिती

Waves Film Bazaar Goa: भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जाणारा ‘वेव्हज फिल्म बाजार’ यावर्षी गोव्यात २० ते २४ नोव्हेंबर यादरम्यान हॉटेल मेरियॉट रिसॉर्टमध्ये भरणार आहे.
Waves Film Bazaar Goa
Waves Film Bazaar GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दक्षिण आशियातील सर्वांत मोठा चित्रपट बाजार आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जाणारा ‘वेव्हज फिल्म बाजार’ यावर्षी गोव्यात २० ते २४ नोव्हेंबर यादरम्यान हॉटेल मेरियॉट रिसॉर्टमध्ये भरणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या काळात भरणाऱ्या या ‘फिल्म बाजार’ला आता ‘वेव्हज फिल्म बाजार’ असे नाव दिले गेले आहे.

मागच्या वर्षी या सोहळ्यात ४० हून अधिक देशांमधून १,८०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. यावरून या बाजाराचे वाढते महत्त्व आणि चित्रपटसृष्टीतील व्यापक प्रभाव दिसून येतो.

‘वेव्हज फिल्म बाजार’चे मुख्य आकर्षण असलेले को-प्रॉडक्शन मार्केट यावर्षीही चित्रपट (फीचर फिल्म) आणि माहितीपट (डाॅक्युमेंटरी) प्रकल्पांसाठी प्रस्ताव मागवत आहे. २००७ मध्ये सुरू झाल्यापासून या व्यासपीठाने चित्रपट निर्मात्यांना कलात्मक आणि आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी निवडक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

द लंचबॉक्स, दम लगाके हयशा, न्यूटन, शिरकोआ: इन लाईज वुई ट्रस्ट, गर्ल्स विल बी गर्ल्स आणि इन द बेली ऑफ अ टायगर, सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांच्या यशामध्ये ‘वेव्हज फिल्म बाजार’चे योगदान आहे, जे जागतिक चित्रपट क्षेत्रावरील त्याच्या प्रभावाचे द्योतक आहे.

Waves Film Bazaar Goa
Waves 2025 परिषदेतही गोवा दालनाची कोट्यवधींची उधळण! 8 पदाधिकाऱ्यांची 'खास' व्यवस्था; 5 कोटींचा चुराडा

तीन विजेत्या प्रकल्पांना पारितोषिके

को-प्रॉडक्शन मार्केटसाठी रोख अनुदान (तीन विजेत्या प्रकल्पांना) : प्रथम पारितोषिक : को-प्रॉडक्शन मार्केट चित्रपट : १० हजार यूएस डॉलर, द्वितीय पारितोषिक : ५ हजार यूएस डॉलर, विशेष अनुदान : को-प्रॉडक्शन मार्केट माहितीपटासाठी ५ हजार यूएस डॉलर. प्रकल्प सादर करण्याची अंतिम तारीख (चित्रपट) : ७ सप्टेंबर २०२५ तर माहितीपट प्रकल्पांसाठी १३ सप्टेंबर २०२५ अशी आहे.

Waves Film Bazaar Goa
Waves 2025 परिषदेतही गोवा दालनाची कोट्यवधींची उधळण! 8 पदाधिकाऱ्यांची 'खास' व्यवस्था; 5 कोटींचा चुराडा

व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा दुवा

फिल्म बाजारचे नामकरण करण्यामागे भारताला आशय, सर्जनशीलता व सहनिर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या धोरणाचा भाग आहे. भारतीय आणि दक्षिण आशियाई चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट व्यवसायातील व्यावसायिकांशी थेट जोडत, वेव्हज फिल्म बाजारने महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून सिद्ध केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com