सध्या चित्रपटगृहात ‘धुरंधर’ या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दमदार कथा, भव्य मांडणी आणि तगडी स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त, राकेश बेदी आणि आर. माधवन यांसारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती हे या सिनेमाचे मोठे आकर्षण ठरत आहे.
बॉक्स ऑफिसवर यश मिळवत असतानाच, या सिनेमाशी संबंधित एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता अर्जुन रामपाल गोव्याबाबत व्यक्त केलेले मत सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. हा व्हिडीओ एका प्रसिद्ध खासगी युट्युब चॅनेलवरील मुलाखतीदरम्यानचा आहे.
या मुलाखतीत निवेदक रणवीर अलाहाबादिया याने अर्जुन रामपालला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना अर्जुन रामपालने सांगितले की, “माझी मुले गोव्यात मोठी होत आहेत आणि गोवा खूप स्वच्छ, शांत आणि सकारात्मक वातावरण असलेले ठिकाण आहे.”
अर्जुन रामपालने गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबरच तिथल्या स्वच्छतेचे आणि जीवनशैलीचे भरभरून कौतुक केले. गोव्यातील मोकळे वातावरण, सुरक्षितता आणि निसर्गसंपन्न परिसर मुलांच्या जडणघडणीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्याने स्पष्ट केले. हा व्हिडीओ प्रत्यक्षात मागील वर्षीचा असला, तरी ‘धुरंधर’ चित्रपटाच्या यशानंतर तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
दरम्यान, अर्जुन रामपालच्या या वक्तव्यामुळे गोव्याची सकारात्मक प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अनेक चाहते आणि नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत गोव्याच्या स्वच्छतेबद्दल आणि शांत वातावरणाबद्दल सहमती दर्शवली आहे. ‘धुरंधर’च्या यशासोबतच अर्जुन रामपालचे हे विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.