Jethalal nano images viral: सध्या सोशल मीडियावर गुगलच्या 'जेमिनी' या एआय टूलने तयार केलेल्या नॅनो इमेजेसचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमध्ये चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचे छोटे, व्यंगचित्रात्मक फोटो तयार करत आहेत. लोकप्रिय 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील लोकप्रिय पात्र, जेठालाल, दया भाभी आणि बबिताजी यांच्या नॅनो इमेजेस सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे जेठालालच्या चाहत्यांनी त्याचे बबिताजीसोबत असलेले ‘प्रेम’ साकार केले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर एक मजेदार चर्चा सुरु झालीये.
जेठालालला मनातल्या मनात बबिताजी आवडतात हे मालिकेतील प्रत्येक चाहत्याला माहीत आहे. याच कल्पनेवर आधारित नॅनो इमेजेस नेटकऱ्यांनी तयार केल्या आहेत. एका फोटोमध्ये जेठालाल आणि बबिताजी एकत्र दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये जेठालालसोबत त्याची पत्नी दया भाभी काळ्या साडीमध्ये आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत, काहीजण दया भाभीच्या बाजूने आहेत, तर काहीजण बबिताजीसोबत जेठालालचा फोटो पाहून आनंद व्यक्त करत आहेत.
चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका आजही प्रेक्षक आवडीने आणि सवडीने पाहतात. सध्या मालिकेत दया भाभीचे पात्र दिसत नाही. त्यामुळे या नॅनो इमेजेसच्या माध्यमातून का होईना, चाहत्यांना त्यांच्या आवडत्या पात्रांना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली आहे.
जेठालाल, दया आणि बबिताजी व्यतिरिक्त, तारक मेहता आणि अंजली मेहता, तसेच भिडे आणि माधवी यांच्याही नॅनो इमेजेस व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या एआय ट्रेंडने जुन्या कलाकारांना पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.