Costao streaming Zee5 release Dainik Gomantak
मनरिजवण

Costao Movie: 'कॉस्ताव'ला क्लीन चिट!! न्यायालयाने आलेमावांची याचिका फेटाळली; 1 मे पासून झी-5 वर प्रदर्शित

Costao Zee5 release: उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझीस यांनी चर्चिल आलेमाव यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची केलेली याचिका फेटाळून लावल्याने मार्ग मोकळा झाला आहे

Akshata Chhatre

पणजी: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा 'कॉस्ताव' चित्रपट गुरुवार दि. १ मे रोजी झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझीस यांनी चर्चिल आलेमाव यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची केलेली याचिका फेटाळून लावल्याने मार्ग मोकळा झाला आहे.

माजी आमदार आलेमाव यांनी यापूर्वी मडगाव येथील कनिष्ठ न्यायालयात चित्रपट निर्माते सेजल शाह, भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि बॉम्बे फेबल्स मोशन पिक्चर्स यांच्याकडून तब्बल १०० कोटी रुपयांच्या मानहानीची मागणी केली होती.

त्यांनी २०२४ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत असा दावा केला होता की, 'कॉस्ताव' हा १९९१ मध्ये त्यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या घटनेवर आधारित आहे, ज्यात त्यांच्या भावाचा मृत्यू झाला होता.

त्याच काळात झालेल्या सोने तस्करीच्या प्रकरणात निर्दोष ठरलेल्या आलेमाव यांनी असा युक्तिवाद केला होता की, चित्रपटात कस्टम अधिकारी कॉस्ताव फर्नांडिस यांना नायक म्हणून दाखवले जात आहे, तर त्यांच्या कुटुंबाला नकारात्मक रूपात चित्रित केले गेले आहे. त्यांनी सुरुवातीला चित्रपटाची निर्मिती थांबवण्याची मागणी केली होती, जी कनिष्ठ न्यायालयाने नाकारली.

त्यानंतर आलेमाव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि चित्रपटाची निर्मिती तसेच प्रदर्शनाला स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र, उच्च न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने निर्णय दिलाय. 'कॉस्ताव' ही एका घटनेने प्रेरित काल्पनिक कथा आहे आणि त्यात डिस्क्लेमर तसेच इतर सुरक्षा उपाययोजनांचा समावेश आहे.

चित्रपटातील कोणतेही पात्र कोणत्याही बेकायदेशीर कृतीत सहभागी असल्याचे स्पष्टपणे दर्शवलेले नाही, असे निर्मात्यांनी सांगितलेय . हा चित्रपट गोव्यातील एका कस्टम अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असून 'कॉस्ताव' आजपासून प्रेक्षकांसाठी झी-५ वर उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT