Nawazuddin Siddiqui's film Costao  Dainik Gomantak
मनरिजवण

Costao Movie: "गोव्यातील त्या मृत्यूसाठी मला दोषी ठरवण्यात आलं" कॉस्ताव चित्रपटाबद्दल बोलताना काय म्हणाले फर्नांडिस?

Costao Fernandes Reaction: सत्य घटनेवर आधारित 'कॉस्ताव' नावाचा एक रोमांचक चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म 'झी ५' वर प्रदर्शित होणार आहे

Akshata Chhatre

Nawazuddin Siddiqui Costao: मे १९९१ यावर्षी गोव्याच्या सासष्टी किनारपट्टीवरील एका गावात एक मोठी तस्करीची कारवाई फसली होती आणि यात एका राजकारण्याशी संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेला अनेक वर्ष उलटून गेली असल्याने ही घटना अनेकांना माहिती देखील नसले पण आता याच सत्य घटनेवर आधारित 'कॉस्ताव' नावाचा एक रोमांचक चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म 'झी ५' वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून कॉस्ताव फर्नांडिस यांच्या शौर्याची गाथा जगासमोर येणार आहे, ज्यांनी एकट्याने तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश केला होता.

त्या घटनेबद्दल बोलताना कॉस्ताव म्हणाले...

मुंबईत असलेले ७१ वर्षीय कॉस्ताव फर्नांडिस या बायोपिकबद्दल प्रचंड उत्सुक आहेत. ''माझ्या जीवनावर आधारित हा चित्रपट केवळ गोव्यातील लोकांना भूतकाळात घेऊन जाणार नाही, तर जगासमोर सत्य आणणार" असल्याचं त्यांनी गोमंतक टाइम्सशी बोलताना सांगितलं.

'कॉस्ताव' हा चित्रपट त्या थरारक घटनेला जिवंत करेल, जिथे एका गुप्त माहितीच्या आधारावर कॉस्ताव यांनी फातर्डे जेट्टीवर येत असलेले सोने तस्कर एकट्यानेच उधळून लावले होते. या झटापटीत एका मोठ्या स्थानिक राजकारण्याच्या भावाचा मृत्यू झाला होता. जप्त केलेले सोने तब्बल २५० किलो वजनाचे होते आणि त्याची किंमत त्यावेळी ८ कोटी रुपये होती.

१९९१ मधील त्या घटनेबद्दल बोलताना कॉस्ताव म्हणाले की ती घटना हेतुपुरस्सर नसून एक दुर्घटना होती. मी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट असल्याने मला स्वतःचा बचाव कसा करायचा हे चांगलं ठाऊक होतं. मात्र, नंतर मला त्या मृत्यूसाठी दोषी ठरवण्यात आलं. या झटापटी आणि चाकूच्या हल्ल्यानंतर राजकारण्याचा भाऊ जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला". जून १९९१ मध्ये सीबीआयने खुनाचा गुन्हा दाखल केला, पण २३ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कॉस्टाओ यांना निर्दोष ठरवलं होतं.

या चित्रपटात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कॉस्ताव यांची भूमिका साकारत आहे. त्याने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. सेजल शाह दिग्दर्शित आणि विनोद भानुशाली निर्मित या चित्रपटात प्रिया बापट, किशोर कुमार, हुसेन दलाल यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

कॉस्ताव स्वतः या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. ते म्हणाले, 'मी अनेकदा सेटवर जाऊन नवाजुद्दीनचे काम पाहिले आणि यापूर्वीही त्याला भेटलो होतो. अनेक दिग्दर्शकांनी माझ्याशी संपर्क साधला होता, पण माझी कथा सांगण्याची माझी तयारी नव्हती. 'देश प्रथम' असे मानणारे कॉस्ताव पुढे म्हणाले, ''कस्टम विभागात काम करणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती''.

गोव्यातील कलाकारांचा सहभाग

या चित्रपटात गोव्याचे कलाकार ध्रुव सिंकू आणि श्रावण फोंडेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ध्रुव एका तस्कराच्या भावाची भूमिका साकारत आहे, तर श्रावण त्या खबऱ्याची भूमिका साकारत आहे ज्याने कॉस्तावना तस्करीच्या ऑपरेशनची माहिती दिली होती.

श्रावण म्हणाला, ''या सिनेमाचे काही सीन्स मुंबई तर गोव्यामध्ये अनेक दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. चित्रपटात काही कोंकणी शब्दांचा वापर केल्याने तो अधिक वास्तववादी वाटतो". आज निवृत्त झालेले कॉस्ताव एक ब्लॅक बेल्ट फिटनेस ट्रेनर आहेत आणि प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात. त्या धाडसी प्रसंगाला ते आजही त्यांचं कर्तव्य मानतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT