Vicky Khaushal Movie  Dainik Gomantak
मनरिजवण

Chhaava: शत्रूला गाफील ठेवणारी 'अनोखी' युद्धकला; विकी कौशलच्या छावा चित्रपटात दडलंय 'पंचतत्त्वांचं गुपित'

Interesting Facts about Chhaava: या चित्रपटात पंचतत्वांचा वापर केला गेलाय. आता हा वापर नेमका कुठे आणि किती आहे...

Akshata Chhatre

Chhaava Hindi Movie: सध्या सगळीकडेच बहुचर्चित असलेला चित्रपट म्हणजे छावा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट बघितल्यानंतर अनेकजणं यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. प्रेक्षकांनी छावा या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतलंय. खरंतर हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना पूर्ण होईल, मात्र आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाची एक रहस्य सांगणार आहोत, ते रहस्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा...

छावा चित्रपटाचं रहस्य काय?

छावा हा चित्रपट जेवढा चित्रपटाची कथा, भक्कम अभिनय आणि दिग्दर्शनावर चालतोय तेवढाच त्यात एक प्लॉट दडलेला आहे. तुम्ही जर का हा चित्रपट नीट लक्ष देऊन पहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल या चित्रपटात पंचतत्वांचा वापर केला गेलाय. आता हा वापर नेमका कुठे आणि किती आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण चित्रपट नीट आठवून बघावा लागेल.

या चित्रपटात रुद्रा नावाचं गाणं बरंच प्रसिद्ध झालंय. औरंगजेब जेव्हा भल्यामोठ्या सेनेसह दख्खनेत उतरतो तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज रणनीती आखतात. शत्रूला गाफील ठेऊन आक्रमण करतात आणि यात पंचतत्वांचा वापर केला गेला आहे.

मराठ्यांची सेना कधी शत्रूवर पाण्यातून हल्ला करते तर कधी थेट जमिनीतून वर येत. घनदाट जंगलात शत्रूला अंदाजही नसेल अशा स्थितीत झाडं आणि फांद्यांचा वापर करून हवेतून मराठे त्यांच्यावर आक्रमण करतात. चित्रपटात संभाजी महाराज हे स्वतः अग्नीचं प्रतीक दाखवले आहेत, अग्नीच्या रूपात ते शत्रूवर तुटून पडतात.

तुम्ही सिनेमागृहांच्या बाहेर जर का चित्रपटाचं पोस्टर पाहिलं तर त्यावर हीच पंचतत्त्व दाखवण्यात आली आहे. कदाचित लेखक आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना यामधून मराठ्यांची शत्रूला गाफील ठेऊन आक्रमण करण्याची पद्धत दाखवायची असेल. मराठ्यांना त्यांच्या भूमीच कानाकोपरा माहिती होता मात्र उत्तरेतून आलेल्या मुघलांना ही जागा नवीन असल्याने ते कित्येकदा मराठ्यांच्या जाळ्यात अडकायचे, गनिमी कावा म्हणून मराठयांच्या युद्धनीतीत याचा उल्लेख आढळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT