Bryan Adams Goa Concert
पणजी: ग्लोबल म्युझिक आयकॉन ब्रायन ॲडम्स सध्या भारत दौऱ्यावर आहे. कॅनडियन गीतकार आणि संगीतकार ब्रायनच्या इंडिया टूरची सांगता गोव्यातील कार्यक्रमासह होणार आहे. बांबोळी येथील मैदानावर आज (१७ डिसेंबर) रोजी ब्रायनची कॉन्सर्ट होणार आहे. ही कॉन्सर्ट ग्रँड होणार असल्याचे सांगितले जात आहे.
ब्रायन ॲडम्सने गेल्या काही दिवसांपूर्वी सो हॅप्पी इट हर्ट्स या वर्ल्ड टूरची घोषणा केली. बांबोळी येथील मैदानावर १७ डिसेंबर २०२४ रोजी ही कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टसाठी तिकिटांचे बुकिंग पूर्ण झाल्याची माहिती आहे. दरम्यान, तिकिटांबाबत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खातरजमा करता येईल.
ब्रायन ॲडम्सच्या इंडिया टूरमध्ये १० डिसेंबरमध्ये शिलाँग, १२ रोजी गुरुग्राम, १३ मुंबई, १४ बंगळुरु, १६ हैद्राबाद आणि १७ डिसेंबर रोजी गोव्यात कॉन्सर्ट पार पडणार आहे. गोव्यातील कॉन्सर्ट इंडिया टूरची अखेरची कॉन्सर्ट असणार आहे.
गेल्या आठवड्यात ब्रायनची मुंबईत कॉन्सर्ट पार पडली या कॉन्सर्टसाठी जॉन अब्राहमने नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. मुंबईनंतर आता ब्रायन गोव्यात टूरची सांगता करणार आहे.
ब्रायनची Summer of 69, Heaven, Everything I Do I Do It for You यासारखी गाणी प्रसिद्ध आहेत. ब्रायनच्या भारतात झालेल्या सर्व कॉन्सर्टला रसिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला होता. गोव्यात होणाऱ्या कॉन्सर्टला देखील मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. शिवाय डिसेंबरमध्ये होत असलेल्या या कॉन्सर्टला स्थानिकांसह देशी - विदेशी पर्यटक हजर राहतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.