New Year 2026 Goa Dainik Gomantak
मनरिजवण

'2026'चं स्वागत करा ग्लॅमरस! बागा बीचवर तमन्ना भाटिया लावणार हजेरी; असे आहेत तिकीट दर

Tamannaah Bhatia Goa: तमन्नाने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे

Akshata Chhatre

Tamannaah Bhatia New Year party Goa: वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात सेलिब्रेट करण्यासाठी गोवा हे नेहमीच पर्यटकांचे पहिले पसंतीचे ठिकाण राहिलेय. नाताळचा उत्साह संपल्यानंतर आता अवघ्या गोव्याला वेध लागलेत ते 'न्यू इयर इव्ह'चे. यंदाचे हे सेलिब्रेशन अधिक ग्लॅमरस करण्यासाठी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया गोव्यात दाखल होतेय. २०२६चे स्वागत करण्यासाठी गोव्यातील प्रसिद्ध 'बागा' बीचवर एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, खुद्द तमन्नाने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे.

तमन्ना भाटिया आणि सोनम बाज्वाचा तडका

'आज की रात' या गाण्याने चाहत्यांना भुरळ घालणारी तमन्ना भाटिया बागा बीचवरील 'लास ओलास' (Las Olas) बीच क्लब आणि रिसॉर्टमध्ये उपस्थित राहणार असून तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "गोवा, तुम्ही तयार आहात का? यंदाची नववर्षाची पूर्वसंध्या गोव्यातील सर्वात मोठ्या बीच पार्टीने साजरी करूया." या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण केवळ तमन्नाच नाही, तर पंजाबी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम बाज्वा देखील आहे. या दोन सौंदर्यवतींच्या उपस्थितीमुळे यंदाची पार्टी 'बिग' आणि 'बेटर' होणार आहे.

खाद्यभ्रमंती आणि संगीताची मेजवानी

'लास ओलास'मध्ये आयोजित या सोहळ्यात पर्यटकांना केवळ सेलिब्रिटींची झलकच मिळणार नाही, तर खानपानाचीही मोठी मेजवानी मिळेल. या कार्यक्रमात 'अनलिमिटेड' खाद्यपदार्थ आणि पेयांची सोय करण्यात आली आहे. स्टार्टर्सपासून ते मुख्य जेवणापर्यंत व्हेज आणि नॉन-व्हेज बिर्याणीची रेलचेल असेल. तसेच, संगीताचा ठेका धरण्यासाठी डीजे चेट्झ, डीजे स्वपनिल आणि डीजे मॅक व्हिएरा हे सज्ज आहेत.

तिकीट दर आणि बुकिंगची माहिती

या भव्य सोहळ्यासाठी तिकीटांचे दरही जाहीर करण्यात आले आहेत. कपल एन्ट्रीसाठी ७,००० रुपये मोजावे लागतील, तर महिलांसाठी ३,००० आणि पुरुषांसाठी ६,००० रुपये दर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे लहानांसाठी १,००० रुपयांमध्ये प्रवेश उपलब्ध आहे. या सर्व दरांमध्ये जेवण आणि पेयांचा समावेश आहे. 'अर्ली बर्ड' तिकीटांची विक्री सध्या जोमाने सुरू असून 'बुक माय शो' किंवा लास ओलासच्या अधिकृत वेबसाईटवरून पर्यटक आपली जागा निश्चित करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानच्या स्टार खेळाडूला अटक, फार्म हाऊसमध्ये मोलकरणीवर केला अत्याचार

Margao: मडगाव पालिकेच्या 'तिठ्या'वरच जुगाराचा अड्डा; सायंकाळ झाली की 'गडगडा' सुरू! प्रशासनाची डोळेझाक

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

SCROLL FOR NEXT