पणजी: प्रसिद्ध अभिनेते सिद्धांत चतुर्वेदी, इशान खट्टर आणि वेदांग रैना या तिघांनी नुकतेच एकत्र गोव्यात एका जाहिरातीचे शूट केले. यात तिघांनी कारमधून गोवा ट्रीपचा आनंद घेतल्याचे दाखवण्यात आलंय. या प्रवासातील फोटो आणि व्हिडिओ अनेकांना जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि दिल चाहता है या चित्रपटांची आठवण करुन देत आहे.
सिद्धांत, इशान आणि वेदांग यांनी बेंटली या कारमधून प्रवास केला आहे. यात इशान कार चालवत असून, शेजारी सिद्धांत बसलाय. तर मागच्या सीटवर वेदांग चील करताना दिसत आहे.
दुसऱ्या फोटो तिघांनी एकत्र सेल्फी घेतली आहे. तिघेही या फोटोत हँडसम आणि डस्की लूकमध्ये दिसतायेत.
सिद्धांत चतुर्वेदीने गोव्यातील फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोजवर अनेकांनी जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि दिल चाहता है अशा चित्रपटांची आठवण करुन देतात असा उल्लेख केला आहे.
दरम्यान, सिद्धांत चतुर्वेदी, इशान खट्टर आणि वेदांग रैना या तिघांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी मोबाईल कंपनीसाठी जाहिरात केली होती. या जाहिरातीत गोव्यातील शूट घेण्यात आले आहे. ऑफिसमधील कामानंतर तिघे फिरण्यासाठी म्हणून गोव्यात जातात, असा आशय या जाहिरातीचा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.