Ajay Devgan And Kajol Goa villa 
मनरिजवण

Ajay Devgan - Kajol Goa Villa: अजय देवगन - काजोलच्या गोव्यातील अलिशान व्हिलात राहण्याची संधी; एका रात्रीसाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये

Ajay Devgan And Kajol 5 bhk villa in Goa: उत्तर गोव्यातील मयडे येथे असणारे अजय आणि काजोल यांचे घर फारच सुंदर आणि आलिशान आहे.

Pramod Yadav

Ajay Devgan And Kajol 5 bhk villa in Goa On Rent

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल अजय देवगन आणि काजोल यांनी अलिकडेच गोव्यात एक व्हिला विकत घेतला आहे. दोघेही जेव्हा गोव्यात असतात त्यावेळी ते याच ठिकाणी राहतात. पाच बेडरुम, स्विमिंग पूल आणि आकर्षक रचना ही या व्हिलाची वैशिष्ट्ये आहेत.

विशेष बाब म्हणजे सामान्य नागरिकांना देखील आता या व्हिलात राहता येणार आहे. पण, यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

व्हिला ईटर्ना (Villa Eterna) असे या व्हिलाला त्यांनी नाव दिले आहे. उत्तर गोव्यातील मयडे (Moira, North Goa) येथे असणारे अजय आणि काजोल यांचे घर फारच सुंदर आणि आलिशान आहे. घरात आकर्षक पेंटींग, उत्साही अंतर्गत रचना पाहायला मिळेल. यासह घरात डायनिंग रुम, लिव्हिंग रुम, खासगी पूल, दोन बेडरुम आहेत.

Ajay Devgan And Kajol Home Night View

घराची छलक नुकतेच कर्ली टेल्स नावाच्या Youtube Channel वरती प्रसिद्ध झाली होती.

Swimming Pool

अजय देवगन आणि काजोलचे घर आता भाड्याने राहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. अजय काजोलच्या चाहत्याने या घरात राहता येणार असून, यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका रात्रीसाठी या व्हिलात राहण्यासाठी ५० हजार रुपये मोजावे लागतील. (Ajay Devgan Goa Villa Online Booking)

Dinning Room

अजय आणि काजोल देखील गोव्यात असतात तेव्हा याच घरात राहतात अशी माहिती आहे. देवगन फॅमिलीच्या या घरात सर्व सुखसोयी आहेत शिवाय आलिशान डायनिंग रुम आणि लिव्हिंग रुम आहे. याशिवाय एक स्विमिंग पूल देखील आहे. व्हिलात राहण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करता येईल. (Kajol Goa Villa Rent)

अजय - काजोलच्या या गोव्यातील घराची सैर दाखवणारा एक व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध झाला होता. यात व्हिलाची आकर्षक झलक पाहायला मिळते. गोव्यात ज्यांचा पर्यटनाचा बेत आहे आणि ज्यांना अजय देवगनच्या घरात राहायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे खिशाला परवडणार असेल त्यांना या संधीचा विचार करण्यास हरकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT