Dhurandhar movie Dainik Gomantak
मनरिजवण

Viral Post: भारतातच नाही तर थेट बलोचमध्येही 'खन्नाची हवा'; दिग्गज नेते झालेत फॅन, म्हणाले "हा तर हुबेहूब..."

Akshaye Khanna viral look: तुम्हाला माहितीये का अक्षयने फक्त भारतीयांनाच नाही तर बलोचमध्ये देखील अभिनयाने वेड लावलंय

Akshata Chhatre

Mir Yar Baloch appreciates Akshaye: ज्येष्ठ अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाने अक्षरशः "इंटरनेटवर आग" लावली असं म्हणायला हरकत नाही. अक्षय खन्नाची ही भूमिका विविध कारणांमुळे प्रेक्षकांच्या मनाला भिडतेय. पण तुम्हाला माहितीये का अक्षयने फक्त भारतीयांनाच नाही तर बलोचमध्ये देखील अभिनयाने वेड लावलंय.

बलोच नेत्याकडून अक्षय खन्नाच्या भूमिकेला 'कॉम्प्लिमेंट'

'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या लूकची आणि अभिनयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असताना, नुकतीच त्याला 'मीर यार बलोच' या एका प्रतिष्ठित बलोच नेत्याकडून मोठी प्रशंसा मिळाली आहे. अक्षय खन्नाने या चित्रपटात पारंपरिक बलोची वेशभूषा परिधान केली, ज्यावर मीर यार बलोच यांनी अक्षय खन्नाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

अक्षय खन्ना हा हुबेहूब बलोची व्यक्तीसारखा दिसतोय अशा शब्दांत त्यांनी अभिनेत्याला कॉम्प्लिमेंट दिली आहे. प्रेक्षकांच्या मते, अक्षय खन्नाने पारंपरिक बलोची संस्कृतीतील तपशील अत्यंत प्रामाणिकपणे आत्मसात केले आहेत. यामुळे चित्रपटात बलुचिस्तानमधील दडपशाही आणि अन्याय याचे चित्रण अधिक प्रभावी आणि वास्तववादी झाले आहे.

सोशल मीडियावर अक्षय खन्नाचेच राज्य

अक्षय खन्नाच्या अभिनयामुळे सोशल मीडियावर सध्या त्याचेच राज्य आहे. इन्स्टाग्रामवर लोक 'धुरंधर'मधील त्याच्या गाण्यावर मीम्स बनवत आहेत किंवा चित्रपटाचे क्लिप्स रिपोस्ट करत आहेत. एकंदरीत काय तर सगळीकडून अक्षयच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अनेक चाहते अक्षय खन्नाच्या अभिनयाचे कौतुक करतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT