पणजी: भाजपचे पणजी मतदारसंघाचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना निवडून आणण्यासाठी महिलांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. काल पक्ष कार्यालयात बूथ क्रमांक 14, 15, 16 व 17 मधील महिलांची बैठक झाली. यावेळी मोन्सेरात यांना या चारही बुथवर मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. नगरसेविका दीक्षा माईणकर, कर्नाटक भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष प्रेमा भंडारी, बेळगावच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी प्रियांका आचरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. (women are trying to get Babush Monserrat elected)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिलांसाठी राबवलेल्या योजना, उजाला योजनेअंतर्गत लाखो गरीब महिलांना गॅस सिलेंडर व शेगडी दिली आहे, शौचालये बांधली, आरोग्य विम्यासह इतर योजनांचा लाभ दिला आहे. त्याची माहिती घराघरापर्यंत पोचवण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महिलांच्या प्रगतीसाठी आणि एकूणच सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांची माहितीही मतदारांना देण्यात येईल असे प्रेमा भंडारी यांनी सांगितले. केंद्रात भाजपचे (Goa BJP) सरकार असल्याने विकासासाठी राज्यात भाजपचीच सत्ता गरजेची आहे, याची माहितीही मतदारांना आम्ही महिला देणार असल्याचे भंडारी म्हणाल्या. वरील सर्व बुथवर बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्याचे दीक्षा माईणकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.