Politics  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोवा निवडणुकीत अपक्षांची भूमिका काय असणार?

2002 साली वेळ्ळीतून निवडून आलेले अपक्ष उमेदवार फिलिप नेरी रॉर्डीग्ज यांनी मंत्रीपदाकरिता भाजप- कॉंग्रेस असा प्रवास करीत इतिहास घडविला होता.

दैनिक गोमन्तक

अपक्ष आमदारांनीही गोव्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 1989 मध्ये मडगावातून अनंत उर्फ बाबू नायक हे ‘मगोप’चा पाठिंबा घेऊन अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी उतारवयात सुद्धा त्यावेळची विधानसभा गाजविली होती. ती त्यांची शेवटची निवडणूक (Election) ही ठरली होती.1994 साली तीन आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. सांताक्रुझमधून व्हिक्टोरिया फर्नांडिस (मामी) वेळ्ळीतून मानुएल फेर्नांडिस व मुरगावातून जॉन वाझ हे अपक्ष आमदार विधानसभेत दिसले होते. यापैकी मामींनी अनेक प्रश्नांवरून रान उठवित विधानसभा गाजविली होती. (Role of independents in Goa elections)

‘डॅंशिग आमदार’

2007 सालीच सावर्डेतून निवडून आलेले अपक्ष उमेदवार अनिल साळगावकर हे मात्र विधानसभेत आपली छाप सोडण्यात संपूर्णपणे अपयशी ठरले होते. 2012 साली तर पाच अपक्ष आमदार निवडून आले होते. त्यांपैकी नावेलीतून निवडून आलेले आवेर्तन फुर्तादो व वेळ्ळीतून निवडून बेंजामिन सिल्वा हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आल्यामुळे त्यांना पर्रीकरांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. फातोर्ड्यातून निवडून आलेले विजय सरदेसाई (Vijay Sardesai), पर्वरीतून निवडून आलेले रोहन खंवटे व डिचोलीतून निवडून आलेले नरेश सावळ या तीन अपक्ष आमदारांनी त्यावेळी सरकारला कात्रीत पकडण्याचा एकसुध्दा प्रसंग सोडला नव्हता. त्यामुळे त्यांना ‘डॅशिग आमदार’ असे संबोधले जायचे.

या निवडणुकीबाबत...

या निवडणुकीत पक्षांची ‘भाऊगर्दी’ होणार असल्यामुळे अपक्षांना संधी मिळू शकते अपक्ष उमेदवार होण्याचे फायदे तसे तोटेही आहेत. इतर पक्षाचे नाराज कार्यकर्ते आपले वजन अपक्षाच्या पारड्यात टाकू शकतात हा एक फायदा झाला. पण अपक्षाला संपूर्ण मोर्चेबांधणी स्वबळावर करावी लागते आणि त्यातून कधीकधी त्याची दमछाकही होऊ शकते. असे असूनही अपक्षांचे महत्त्व दुर्लक्ष करता येणे शक्यच नाही. आता यावेळी किती अपक्ष बाजी मारतात आणि ते पुढील विधानसभेत कोणता ‘रंग’ दाखवतात. याचे उत्तर येणारा काळच देणार आहे हे निश्चित.

विश्वजीतची अपक्ष निवडणूक

2002 साली वेळ्ळीतून निवडून आलेले अपक्ष उमेदवार फिलिप नेरी रॉर्डीग्ज यांनी मंत्रीपदाकरिता भाजप- कॉंग्रेस असा प्रवास करीत इतिहास घडविला होता. 2007 साली कॉंग्रेसचा (Congress) एका घराण्यात दोघांना उमेदवारी देऊ नये, असा कॉंग्रेसपक्षाचा नियम असल्यामुळे प्रतापसिंह राणेंचे पुत्र विश्वजीतांनी आपली पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. नंतर त्यांनी कॉंग्रेसमधून प्रवेश करून पोटनिवडणुकीतही विजय संपादन केला होता.

पुनरावृत्तीची शक्यता

2017 साली प्रियोळातून गोविंद गावडे, सांगेतून प्रसाद गावकर व पर्वरीतून परत रोहन खंवटे हे तीन अपक्ष आमदार निवडून आले. यापैकी गोविंद गावडे यांना भाजपचा तर रोहन खंवटे यांना कॉग्रेसचा पाठिंबा लाभला होता. हा इतिहास पाहिल्यास गोव्याच्या राजकीय घडामोडीत अपक्षांची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसून येत आहे. यावेळीही याचीच पुनरावृत्ती होण्याची अधिक संभावना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT