वेळीप यांचा उच्च न्यायालयात आव्हान अर्ज

 
Dainik Gomantak
गोवा निवडणूक

वेळीप यांचा उच्च न्यायालयात आव्हान अर्ज; निवडणूक लढविण्याची तयारी

अर्जुन वेळीप यांनी आपल्या सरकारी नोकरीचा दिलेला राजीनामा न स्वीकारण्याचा सरकारी निर्णयाला वेळीप यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या आव्हान अर्जावर 7 जानेवारी रोजी निवाडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: दक्षता खात्याने सुरू केलेली चौकशी प्रलंबित आहे, असे कारण पुढे करून उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप यांनी आपल्या सरकारी नोकरीचा दिलेला राजीनामा न स्वीकारण्याचा सरकारी निर्णयाला वेळीप यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या आव्हान अर्जावर 7 जानेवारी रोजी निवाडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेळीप (Arjun Velip) यांनी यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy Chief Minister Babu Kavalekar) यांच्या विरोधात केपे मतदारसंघातून निवडणूक (Election) लढविण्याचा आपला इरादा यापूर्वीच स्पष्ट केला आहे. त्यासाठी त्यांनी दिलेला सरकारी नोकरीचा राजीनामा सरकारने स्वीकारणे आवश्यक आहे. मागच्या आठवड्यात हा अर्ज सुनावणीस आला असता ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी राज्याची बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागून घेतल्याने ही सुनावणी तहकूब केली होती. आपल्यावर जरी चौकशी सुरू करण्यात आली असली तरी आपल्यावरील आरोपात काहीच तथ्य न सापडल्याने दक्षता खात्याने ही चौकशी बंद केली होती. आपल्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार राजकीय हेतूने प्रेरित होती असा दावा वेळीप यांनी उच्च न्यायालयात केला असून, त्यामुळे आपला राजीनामा सरकारला स्वीकारण्यास भाग पाडावे, अशी मागणी केली आहे.

मुद्दामहून बंद प्रकरण उकरून काढले!

वेळीप हे सध्या बाणावली पंचायतीचे सचिव असून, फातर्पा पंचायतीत ते सचिव म्हणून असताना त्यांनी निधीचा गैरवापर केला अशा आशयाची तक्रार फातर्पाचे तत्कालीन सरपंच सेंझिल डिकॉस्ता यांनी दाखल केली होती. याच प्रकरणी वेळीप यांच्या विरोधात दक्षता खात्याने चौकशी सुरू केली होती. मात्र, मागची कित्येक वर्षे ती शितपेटीत पडली होती. आता आपण उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवू पाहत असल्याने हे बंद झालेले प्रकरण मुद्दामहून पुन्हा उकरून काढले आहे, असा वेळीप यांचा दावा आहे. वेळीप हे तृणमूल (TMC) पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT