गोवा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप आणि उत्पल पर्रीकर यांच्यात उमेदवारी वरून झालेला वाद राज्यात चांगलाच चर्चेत आला आहे . काही दिवसांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती, दरम्यान पर्रीकर यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आले होते. मात्र भाजपकडून त्यांना दोन पर्याय देण्यात आले होते. (Utpal Parrikar's withdrawal for goa assembly election and gave BJP an option)
पर्रीकरांची (Utpal Parrikar) भूमिका
या पर्यायला धुडकावत पर्रीकरांनी अपक्ष निवढणूक लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पर्रीकर यांची समजूत काढल्याने पर्रीकरांनी आता निर्णय बदलला आहे. पर्रीकर म्हणाले,
" मी माघार घ्यायला तयार आहे; परंतु पणजी मतदारसंघातील (Panajim Constituency) उमेदवार बदला, स्वर्गीय मनोहर पर्रीकर ज्या मतदार संघातून तब्बल पाच वेळा निवडून आले त्या मतदारसंघात एक गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला तसेच स्वच्छ चारित्र्य असणारा उमेदवार भाजपने द्यावा, असा पर्याय पर्रीकरांनी भाजप समोर ठेवला आहे."
पर्रीकरांची समजूत काढण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरूच आहेत, देवेंद्र फडणवीस, जे पी नड्डा, अमित शाह यांनी देखील त्यांना फोन केले होते, मात्र आता पर्रीकरांनी भाजप समोर पर्याय ठेऊन भाजपला धर्मसंकटात टाकले आहे. या मुद्द्यावर आता भाजपची काय भूमिका असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पर्रीकरांना जनतेचा पाठिंबा
पर्रीकरांना उदय मडकईकर यांची साथ मिळाली होती, तसेच जनतेने पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकरांची समजूत काढल्याने त्यांच्या निर्णयात आता बदल झाला आहे.
पर्रीकरांच्या या भूमिकेमुळे बाबुश मोन्सेरात यांच्या चिंतेत भर
पर्रीकरांच्या या भूमिकेमुळे बाबुश मोन्सेरात यांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे. तसेच यावर गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या 30 जानेवारीला गोवा दौऱ्यावर असणार आहेत.
अमित शहा गोवा दौऱ्यावर
अमित शहा आणि पर्रीकरांची निवडणूक बाबत काही खास बैठक होण्याची शक्यता आहे. पर्रीकरांची समजूत काढण्यासाठी अमित शहा गोवा दौऱ्यावर असल्याची चर्चा सध्या राज्यात रंगू लागली आहे. पर्रीकरांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीस यांना अखेर यश आले असे म्हणायला हरकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.