Utpal or Babush who will get ticket from Panaji constituency Dainik Gomantak
गोवा निवडणूक

पणजीत उत्कंठा शिगेला! उत्पल की बाबूश?

भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दिल्लीच्या राजकारणात गेले असतानाही येथे भाजपचे सिद्धार्थ कुंकळयेकर विजय झाले होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पणजीत महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी उत्पल आणि बाबूश मोन्सेरात यांनी एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच केले. यावेळी मोन्सेरात यांच्याबरोबर ताळगाव आणि सांताक्रुझ मतदारसंघातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत होते, तर उत्पल यांच्याबरोबर पर्रीकरांना मानणारा जुना भाजपचा गट दिसत होता.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पणजी मतदारसंघात स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर भाजपचे तिकीट कुणाला, हा प्रश्न होता. आता पुन्हा 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे तिकीट कुणाला ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सध्याचे आमदार म्हणून बाबूश मोन्सेरात भाजपच्या तिकिटाचे हक्कदार आहेत. मात्र, पणजीतून सहा वेळेला आमदार झालेल्या आणि राज्यासह देशाच्या राजकारणामध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल निवडणुकीसाठी उत्सुक आहेत. काल त्याची प्रचीतीही आली. पणजी मतदारसंघावर 1994 ते 2019 असे तब्बल 25 वर्षे भाजपचे वर्चस्व होते. भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा हा मतदारसंघ. पर्रीकर दिल्लीच्या राजकारणात गेले असतानाही येथे भाजपचे सिद्धार्थ कुंकळयेकर विजय झाले होते.

2017 मध्येही सिद्धार्थ यांनी पणजीची जागा आपल्याकडेच ठेवली होती. मात्र, मनोहर पर्रीकर यांच्यानंतर प्रथमच 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बाबूश मोन्सेरात यांनी पणजीची जागा जिंकली. पण काही दिवसांतच काँग्रेसच्या दहा आमदारांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात मोन्सेरात आघाडीवर होते. 2019 च्या पोटनिवडणुकीमध्ये बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्ध सिद्धार्थ कुंकळयेकर उभे होते. त्यावेळी पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना भाजपच्या नेत्यांनी थोडे थांबण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आता 2022 च्या निवडणुकीमध्ये उत्पल कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच, या मनस्थितीत असल्याने भाजपसमोर पेच कायम आहे. पणजीचे तिकीट कोणाला द्यायचे, निष्ठावंत कार्यकर्त्याला की बाहेरून आलेल्या आमदाराला? तथापि, भाजपला बाबूशना यांना डावलणे महागात पडणार, असा अंदाज असल्यानेच भाजपचे नेते बाबूश यांच्या बाजूने उभे असल्याचे दिसत आहे.

तिकीट कोणाला : पणजीचे तिकीट कोणाला द्यायचे, निष्ठावंत कार्यकर्त्याला की बाहेरून आलेल्या आमदाराला? तथापि, भाजपला बाबूशना यांना डावलणे महागात पडणार, असा अंदाज असल्यानेच भाजपचे नेते बाबूश यांच्या बाजूने उभे असल्याचे दिसत आहे.

1984 ते 2019 पर्यंत भाजपचा बालेकिल्ला.  मनोहर पर्रीकर सलग 25 वर्षे 6 वेळा आमदार.

2017 च्या निवडणुकीत सिद्धार्थकडून बाबूश यांचा 1079 मतांनी पराभव.

2017 च्या पोटनिवडणूक पर्रीकर यांच्याकडून गिरीश चोडणकर यांचा 4803 मतांनी पराभव.

2019 बाबूशकडून सिद्धार्थ यांचा 1758 मतांनी पराभव.

2019 बाबूश मोन्सेरात यांचा पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT