Trinamool congress graph declining in Goa  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

दिग्गज नेते गळाला लागूनही गोव्यात तृणमूलची वाट बिकटच!

तृणमूलचे एकेक मोहरे ढासळताना दिसत आहेत. त्यातून एक गोष्ट सिध्द होते ती म्हणजे तृणमूल गोव्यातील मतदारांचा तसेच नेत्यांचा योग्य प्रकारे आढावा घेऊ शकलेला नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: साधारणपणे चतुर्थीच्या सुमारास पश्चिम बंगालच्या तृणमूल कॉंग्रेसने (TMC) गोव्यात प्रवेश केला. प्रशांत किशोर सारखा रणनीतीकार आपल्या ‘आयपॅक’ द्वारा या पक्षाची सूत्रे सांभाळीत असल्यामुळे हा पक्ष गोव्यात स्थान प्राप्त करेल, असे वाटत होते. लुईझिन फालेरोंसारख्या गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना या पक्षाने गळास लावून सुरुवातही चांगली केली होती. (Trinamool congress graph declining in Goa)

कॉंग्रेसचे (Congress) तीनदा निवडून आलेले आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केवळ सत्तावीस दिवसांत केलेले बहिगर्मनही तृणमूलच्या अंगाशी आल्यासारखे वाटत आहे. माजी आमदार लवू मामलेदार यांनी तृणमूलने मगोपशी (MGP) युती केल्यावर पक्ष त्यागल्यामुळे तिथेही त्यांना धक्का बसला आहे. आणि आता साळगावात उमेदवारी न दिल्यामुळे ॲड. यतीश नाईक यांनी तृणमूलशी काडीमोड घेतला आहे. हे पाहता तृणमूलचे एकेक मोहरे ढासळताना दिसत आहेत. त्यातून एक गोष्ट सिध्द होते ती म्हणजे तृणमूल गोव्यातील मतदारांचा तसेच नेत्यांचा योग्य प्रकारे आढावा घेऊ शकलेला नाही हा अनेकांना मध्येच पक्ष सोडावा लागतो हेही खटकणारे आहे.

यामुळे तृणमूलचा हवेत उडणारा ‘पतंग’ जमिनीवर आल्यासारखा वाटतो आहे. वास्तविक पश्चिम बंगाल व गोवा यात बराच फरक आहे. गोवा जरी छोटे राज्य असले तरी इथली समीकरणे नेहमीच वेगळी असतात. या समीकरणावर राष्ट्रीय व एखाद्या राज्यातील समीकरणाचा प्रभाव पडेलच असे नाही. म्हणूनच तर १९६३ साली पुऱ्या देशावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेसचे गोव्यात ‘पानिपत’ झाले होते. तसेच भाजपला गोवा विधानसभेत प्रवेश करण्याकरिता दोन निवडणुकांची (Goa Election 2022) वाट पाहावी लागली होती. आता याचे प्रात्यक्षिक आता तृणमूललाही बघायला मिळते आहे.

एरव्ही सुध्दा याबाबतीत लोकांच्या नकारार्थी प्रतिक्रिया ऐकायला मिळताहेत. त्यातून तृणमूलने घाई केली का? असेच वाटू लागले आहे. भाजपला पराभूत करायचे हे ध्येय तृणमूल बाळगत असले तरी गोव्यात भाजपविरोधात अनेक पक्ष रिंगणात उतरल्यामुळे हे उद्दिष्ट गाठणे,वाटते तितके सोपे नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल हा कॉंग्रेसहून प्रभावी पक्ष आहे. किंबहूना तृणमूलने तिथे कॉंग्रेसची जागा घेतली आहे,असे म्हटले तर ते चूक ठरू नये. पण गोव्यात तशी परिस्थिती नाही. गोव्यात अजूनही भाजपचा विरोधक म्हणून कॉंग्रेसकडेच बघतात. आणि दुसरे विरोधी पक्ष आले तर ते भाजपला हरविण्यापेक्षा कॉंग्रेसची मतपेढी कमी करण्याचे काम करताना दिसतात. याचकरिता विविध पक्ष रिंगणात उतरल्यास भाजपला हरविणे कठीण काम आहे,त्याकरिता तृणमूलने आधी कॉंग्रेसची जागा घ्यायला हवी होती.

मगोप जेव्हा फॉर्मात होता तेव्हा भाजपची अशीच स्थिती होती. जोपर्यंत मगोप जोरात आहे, तोपर्यंत भाजपला गोव्यात वाव नव्हता. हे जाणूनच पर्रीकरांनी मगोपची ‘सोयरीक’ करून १९९४ ची निवडणूक लढविली. व नंतर मगोपची शक्ती क्षीण करायला सुरुवात केली. आणि आता गोव्यात भाजप मगोप पेक्षा जास्त प्रभावी ठरला आहे. त्यावेळी जी परिस्थिती भाजपची होती तीच आज तृणमूलची आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT