TMC  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election 2022: TMC ने 11 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर TMC ने गोवा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर TMC ने गोवा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तृणमुलने कॉंग्रेसने राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीच्या पाश्वभूमीवर आपल्या उमेदवारांची पहिली यादी तृणमुलने जाहीर केली आहे.

दरम्यान, दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये अती-तटीचा सामना रंगत आहे. निवडणूक अगदी काही दिवसांवर असल्यामुळे राजकीय पक्ष स्वत:च्या पक्षाची ताकद वाढवण्यावर आणि समोरच्या पक्षाची ताकद कमी करण्यावर भर देत आहेत. यादरम्यान आपल्याला परस्पर विरोधी पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात तर कधी ट्वीटर युद्ध पाहायला मिळत आहे. समोरच्या पक्षातील त्रुटी काढण्यातही राजकारणी चांगलेच व्यस्त आहेत.

उमेदवारांची यादी

  • 1 संदीप अर्जुन वझरकर पर्वरी

  • 2 किरण मोहन कांदोळकर हळदोणा

  • 3 सांत आंद्रे- जगदीश भोबे

  • 4 कुंभारजुवा- समील वळवईकर

  • 5 पर्ये- गणपत गावकर

  • 6 कुठ्ठाळी- गिल्बर्ट रोड्रिग्ज

  • 7 नुवे- जोस काब्राल

  • 8 फातोर्डा- लुईझिन फालेरो

  • 9 बेणावली- चर्चिल आलेमाव

  • 10 नावेली- वालांका आलेमाव

  • 11 कुंकळ्ळी- जोरसन फर्नांडिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT