The propaganda spread in kunkalli, the fairies of the accused transplant Dainik Gomantak
गोवा निवडणूक

कुंकळ्ळीत प्रचार शिगेला; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

घरोघरी भेटी, कोपरा बैठकांवर भर: जाहीर सभांचा धडाका

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी: कुंकळ्ळी मतदारसंघात जरी दहा उमेदवार रिंगणात उतरले असले, तरी भाजपचे क्लाफास डायस, तृणमूलचे डॉ. जॉर्सन फर्नांडिस,काँग्रेसचे युरी आलेमाव, आपचे प्रशांत नाईक व अपक्ष उमेदवार संतोष फळदेसाई यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. समाज माध्यमातून डिजिटल प्रचारावर या चार उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असून डिजिटल स्क्रीन, गाण्याची जिंगल्स, फेसबूक व इंस्टाग्राम वर व्हीडिओ अपलोड करून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी पाचही प्रमुख उमेदवार धडपडत आहेत. घरोघरी भेटीवरही उमेदवारांनी भर दिला आहे.घरोघरी जाऊन उमेदवार मतांचा जोगवा मागत आहेत.(Goa Election2022)

घरोघरी प्रचारात आम आदमी पक्षाने आघाडी घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे.काँग्रेसचे उमेदवार स्थानिक लोकप्रतिनिधींना व कार्यकर्त्यांना घेऊन घरोघरी भेटी देऊन आपल्याला एक संधी द्या,अशी विनवणी करत आहेत. भाजपाचे विद्यमान आमदार क्लफास डायस स्थानिक कार्यकर्त्यांची फौज घेऊन प्रत्येक घरात फिरत आहेत. भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्षाने कोपरा बैठका व जाहीर सभांचा धडाका लावला आहे. भाजपाचे उमेदवार डायस यांच्यासाठी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी(Smrti Irani) यांनी मतदारांकडे मते मागितली. इराणी यांनी गिरदोली येथे जाहीर सभा घेतली. डायस यांच्यासाठी भाजपचे अनेक नेते मोठे नेते कुंकळ्ळीत ठाण मांडून बसले आहेत.

कर्नाटकातील राजू, महाराष्ट्राचे माजी आमदार योगेश सागर, व इतर नेते घरोघरी प्रचारात भाग घेत आहेत.महाराष्ट्र व कर्नाटकातून भाजपचे अनेक कार्यकर्ते व नेते कुंकळळीत प्रचार करताना दिसतात.येत्या काही दिवसात आणखी केंद्रीय नेते कुंकळ्ळी मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत.

आमदार क्लाफास डायस यांच्या सांगे गिरदोली जिल्हा पंचायत सदस्य संजना वेळीप, कुंकळ्ळी नगरपालिकेचे नगरसेवक विदेश देसाई, विशाल देसाई, राहुल देसाई, पोलिटा कार्नेरो, रूपा गावकर तसेच माकाझान, आंबावली व गिरदोली पंचायतीचे सरपंच व पंचायत मंडळ क्लाफास यांचेसाठी झटताना दिसतात.आम आदमी पक्षाने प्रचारात बरीच आघाडी घेतली आहे.दिल्लीहून आलेले आमदार, मंत्री कोपरा बैठकांतून प्रचार करीत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया(Manish Sisodia) यांनी दोन जाहीरसभा घेऊन प्रशांत नाईक यांच्या साठी मते मागितली.

तर युरी आलेमाव यांच्याबरोबर पालिकेचे नगरसेवक व माजी आमदार तथा युरीचे वडील ज्योकीम आलेमाव यांचे जवळचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. मात्र,त्यांच्यासाठी काँग्रेसच्या एकाही राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील मोठ्या नेत्याने प्रचार कार्यात भाग घेतल्याचे दिसले नाही. युरी यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला असून कोपरा बैठकांतून ते आपला प्रचार करीत आहेत.तृणमूलचे उमेदवार डॉ.जॉर्सन फर्नांडिस(dr.Jorson P Fernandes) यांनी प्रचारात आघाडी घेतली असून अनेक काँग्रेस नेत्यांनी तृणमूलचा हात धरल्याने त्यांचा ग्राफ बराच वाढलेला पाहायला मिळतो.तृणमूलचे राष्ट्रीय नेते डेरेक ओब्रायन(Derek O'Brien) ,महुआ मोईत्रा, किरण कांदोळकर यांनी डॉ. जोर्सन यांच्यासाठी प्रचार केला आहे.

अपक्ष उमेदवार संतोष फळदेसाई यांनीही प्रचाराचा धडाका लावलेला असून युवा कार्यकर्त्यांची फौज घेऊन ते घरोघरी फिरत आहेत.क्लाफास डायस भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढत असून ते आपली जागा राखण्यात यशस्वी ठरणार का?राष्ट्रवादीतून गोवा फॉरवर्ड अन् तिथून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले कॉंग्रेसचे उमेदवार युरी आलेमाव आपल्या वडिलांच्या पुण्याईवर आमदार बनण्याचे स्वप्न पहात आहेत.

तृणमूलचे उमेदवार डॉ. जॉर्सन फर्नांडिस(Dr Jorson P Fernandes) यांना यापूर्वी मतदारांनी नाकारले होते. त्यांना यावेळी मतदार स्वीकारणार का? अपक्ष उमेदवार संतोष फळदेसाई यांनीही विकासकामे केली आहेत. त्यांना मतदान संधी देणार का आपचे प्रशांत नाईक यांना मतदार आमदार बनविणार? मतदारांच्या मनात काय आहे,हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pro Kabaddi League Final 2025: दबंग दिल्ली पुन्हा कबड्डी 'चॅम्पियन'! जिंकला PKL 12चा किताब; फायनलमध्ये पुणेरी पलटनची कडवी झुंज अपयशी

Raigad Fort: मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी; 'किल्ले रायगड'

Kuldeep Yadav Record: परदेशी मैदानांवर कुलदीपची 'जादू'! चहलला पछाडून बनला 'नंबर 1' भारतीय गोलंदाज; ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधली किमया VIDEO

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT