Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'काँग्रेसने गोव्यात आणलेल्या प्रकल्पाचे श्रेय भाजप सरकार घेतेयं'

काँग्रेसने गोव्यात आणलेल्या मोठमोठ्या प्रकल्पाचे श्रेय विद्यमान भाजप सरकार (BJP Government) घेऊन, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: काँग्रेसने गोव्यात आणलेल्या मोठमोठ्या प्रकल्पाचे श्रेय विद्यमान भाजप सरकार (BJP Government) घेऊन, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. मुरगावात पूर्ण झालेल्या राष्ट्रीय महामार्गाचा उड्डाणपूल काँग्रेसच्या (Congress) कार्यकाळातील होता. आता तो पूर्ण झाल्यानंतर त्याचे सुद्धा श्रेय भाजप (BJP) घेत असल्याची माहिती कामत यांनी दिली. (The BJP Government Takes Credit For The Project Brought To Goa By The Congress)

मुरगाव काँग्रेस उमेदवार संकल्प आमोणकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्षा शरद चोपडेकर, मुरगाव काँग्रेस प्रभारी तोफिक मोलानी, हारिफ शेख, दीक्षा तळवणेकर, उमेदवार संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) उपस्थित होते. पुढे बोलताना कामत म्हणाले की भाजपने कोणता विकास केला असे ते ठामपणे सांगू इच्छित आहे. मुरगावात अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.

काँग्रेस कार्यकाळात सुरू झालेले प्रकल्पाचे श्रेय घेण्याचे काम मात्र भाजपने केले असल्याचा आरोप दिगंबर कामत यांनी केला. पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येत नाही आणि मोठ मोठे प्रकल्प भाजपच्या कार्यकाळात आणले आहे असे सांगून भाजप स्वतःची इज्जत घालवीत असल्याची माहिती कामत यांनी दिली. मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असून मी कधीही पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही. गोव्यात काँग्रेस पूर्ण बहुमत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती शेवटी दिगंबर कामत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT