Congress Leaders Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'तो' व्हिडिओ बनावट! गोवा कॉंग्रेसचा दावा

कॉंग्रेस नेते शनिवारी रात्री पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, त्यांना निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणूक तोंडावर असताना शनिवारी रात्री एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये कॉंग्रेसचे तीन आणि तृणमूल कॉंग्रेसचा एक उमेदवार निवडणुकीनंतर चार कोटी घेऊन दल बदलण्याची चर्चा करताना दिसत होते. दिल्लीतील एका वृत्तवाहिनीने हे 'स्टींग ऑपरेशन' केल्याचा दावा केला होता. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, कॉंग्रेसने हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे. याबबात स्पष्टीकारण देण्यासाठी कॉंग्रेस (Congress) नेते शनिवारी रात्री पत्रकार परिषद (Press Conference) घेणार होते. मात्र, त्यांना निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली.

“निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला गोष्टी स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची परवानगी न दिल्याने, 12 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 9.45 वाजता आयोजित करण्यात येणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे,” असे शनिवारी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, एआयसीसी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचे म्हणले आहे. याबाबत कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. कॉंग्रेसने व्हिडिओ तयार करणाऱ्या हिन्दी वृत्तवाहिनी विरुद्ध तक्रार दाखल केली असून, हा व्हिडिओ तत्काल काढून टाकण्याची निवडणूक आयोगाकडे (Election Commission) मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT