पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चुरस बघायला मिळत आहे तर निकलाआधीच महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे महत्व वाढले आहे. भाजप आणि कॉंग्रेस मगोपला गळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व सुरू असताना शिवसेनेची मात्र कुठेच चर्चा नाही. (Goa assembly election 2022 live updates)
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. 11 जागा लढवणाऱ्या शिवसेनाला एकही जागा मिळण्याची शक्यता सध्या दिसत नाही. शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी गोव्यात जोरदार प्रचार केला होता. मात्र, त्याचा पक्षाला फायदा झाला नाही. शिवसेनेला गोव्यात एक तरी जागा मिळणार का? असा प्रश्न आता उद्भवत आहे. शिवसेनेचा (Shiv Sena) गोव्यात 'फ्लॉप शो' झाला अशी चर्चा मंतदारांमद्धे आहे.
दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले होते की, गोव्यात जनतेचा विकास झाला नाहीतर पक्षांचा विकास झाला आहे. राज्यतील प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारने गोवेकरांचा विश्वासघात केला आहे. उत्पल उत्पल पर्रिकरांना (Utpal Parrikar) आम्ही कोणत्याही प्रकारचा किंतु न बाळगता पाठिंबा दिला आहे. आम्ही निवडणुकीमध्ये 11 उमेदवार उभे केले आहेत. आणि मला विश्वास आहे की, ते प्रचंड बहुमताने विजयी होतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.