Sharad Pawar & Uddhav Thackeray Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कॉंग्रेस स्वबळावर

गोव्यातील (Goa) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shiv Sena) एकत्र निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. आघाडी निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) सध्या गोव्यात आहेत. बैठक घेऊन दोन्ही पक्ष कोण किती जागांवर एकत्र निवडणूक लढवणार हे जाहीर करु शकतात.

वास्तविक, गोव्यात महाराष्ट्र युतीचा प्रयोग पुन्हा करण्याचा विचार होता, परंतु काँग्रेसने बहुधा तसे करण्यास नकार दिला, ज्याला राष्ट्रवादीने मंगळवारी दुजोरा दिला. राष्ट्रवादीचे नेते पटेल म्हणाले, 'गोव्यात स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो, असं काँग्रेस (Congress) म्हणत आहे. तर गोव्यात कॉंग्रेसला एकही जागा मिळवता येणार नाही.'

नवाब मलिक यांनी रविवारी ही माहिती दिली

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी सांगितले होते की, आम्हाला गोव्यात काँग्रेससोबत निवडणूक लढवायची होती, परंतु काही स्थानिक नेत्यांमुळे युती होऊ शकली नाही. 18 जानेवारीला आमचे सरचिटणीस आणि एक मंत्री गोव्यात जाऊन युतीबाबत बोलणार आहेत. मात्र आता राष्ट्रवादीने गोव्यात काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

2017 मध्ये कोणाला किती जागा मिळाल्या

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 36 जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी काँग्रेसने 17 तर भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे गोवा फॉरवर्ड पार्टीने (GFP) चार जागांवर निवडणूक लढवली आणि तीन जागा जिंकल्या. याशिवाय, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (एमजीपी) 34 जागा लढवल्या, मात्र त्यांना केवळ तीन जागा मिळाल्या. याशिवाय 3 जागा अपक्ष उमेदवारांच्या खात्यात आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली.

गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार

गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे. 21 जानेवारीपासून नामांकन सुरू होईल. 28 जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यावेळी कडक प्रोटोकॉल तयार केला आहे. त्यानुसार 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही रॅली, रोड शो आणि पदयात्रेला परवानगी दिली जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT