Sanjay Raut Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'स्वबळावर काँग्रेस गोवा जिंकू शकत नाही...: संजय राऊत

काँग्रेसने (Congress) किनारपट्टीच्या राज्यात विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) स्वबळावर लढवली तर 10 जागाही जिंकता येणार नाहीत.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. यातच किनारपट्टीवरील राज्य असणाऱ्या गोव्याचा देखील समावेश आहे. गोवा विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील (Maharashtra) युतीचा प्रयोग करण्याच्या प्रस्तवाला कॉंग्रेसकडून उत्तर न मिळाल्याने शिवसेना नाराज झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुरुवारी गोव्यातील राजकीय परिस्थिती अशी आहे की, काँग्रेसने (Congress) किनारपट्टीच्या राज्यात विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) स्वबळावर लढवली तर 10 जागाही जिंकता येणार नाहीत.

गोव्यात काँग्रेस काय विचार करुन लढतेय माहीत नाही : राऊत

गोव्यात काँग्रेसचे केवळ तीन आमदार आहेत. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी काँग्रेसला कठीण काळात पाठिंबा दिला होता. पण काँग्रेस काय विचार करत आहे हे मला माहीत नाही. ते एकटेच लढले तर 10 चा आकडाही पार करु शकणार नाही.

काँग्रेसने 30 जागा लढवल्या, उर्वरित 10 मित्र पक्षांना द्या: राऊत

गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव, सीएलपी नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि गोवा काँग्रेसचे प्रमुख गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांच्याशी आमची चर्चा झाली असून काँग्रेसने 40 पैकी 30 विधानसभेच्या जागा लढवाव्यात आणि मित्रपक्षांविरुद्ध लढावे, असा प्रस्ताव आम्ही ठेवला होता, असेही राऊत म्हणाले. राऊत पुढे म्हणाले की, 10 विधानसभेच्या जागा, जिथे काँग्रेसने गेल्या 50 वर्षांत निवडणूक जिंकलेली नाही, त्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला दिल्या जाऊ शकतात.

राहुल गांधी युतीच्या बाजूने होते पण...

राऊत म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) युतीच्या बाजूने होते, परंतु स्थानिक काँग्रेस नेतृत्वाचा दृष्टिकोन वेगळा आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी विधानसभा निवडणुकीत राजकीय पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या उमेदवारीला शिवसेना पाठिंबा देण्यास तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

SCROLL FOR NEXT