Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: मतदार प्रतिनिधींना RTPCR चाचणी बंधनकारक

दक्षिण उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस जारी

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभा निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान, कोविड संबंधी खबरदारी म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. (RTPCR is mandatory for polling delegates if two doses of vaccination not completed in goa)

ज्या पोलिंग एजंटनी लसीकरण केलेले नाही, किंवा ज्यांचे केवळ एकच लसीकरण झालेले आहे. त्यांना अधिकृत प्रयोगशाळेतून आरटी-पीसीआर/आरएटी टेस्ट करणे बंधनकारक आहे. तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांना देखील हे नियम बंधनकारक असणार आहेत. निवडणूका जसजश्या जवळ येत आहेत तसे, राज्यातील निर्बंध आणखी कडक होत आहेत.

14 फेब्रुवारी पर्यंत कलम 144 लागू

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी सायंकाळी 6 पासून 14 फेब्रुवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

गोव्यातील (Goa) सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने बंद

गोव्यातील (Goa) सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने 12 फेब्रुवारी संध्याकाळी 6 पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. त्याचबरोबर मतमोजणी 10 मार्च रोजी करण्यात येणार असून या दिवशी देखील गोवा राज्यातील सर्व मद्यविक्री दुकानांना कुलूप असेल, अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी
पुढील काही दिवसात गोव्यासह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पाचही राज्यात एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्चच्या सायंकाळी 6:30 पर्यंत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT