विधानसभेला भाजपचा ‘प्लस 22’चा नारा Dainik Gomantak
गोवा निवडणूक

विधानसभेला भाजपचा ‘प्लस 22’चा नारा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत दाजी साळकर यांची घरवापसी

दैनिक गोमन्तक

पणजी: विरोधकांचे सरकारवर (Goa Government) आरोप करणे हे त्यांचे काम आहे. परंतु गेल्या दहा वर्षांत राबवलेला स्वयंपूर्ण विकास आणि कोरोना संकटात लोकांचे केलेले रक्षण या जोरावर भाजप (BJP) 2022 सालच्या विधानसभेला ‘प्लस 22’ हा आकडा सहज पार करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी व्यक्त केला. कृष्णा उर्फ दाजी साळकर (Dajji Salkar) यांच्या पणजी येथे भाजप प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.

वास्को मतदारसंघातून 2017 च्या निवडणुकीत दाजी साळकर यांनी भाजपकडून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त केली होती. यानंतर काल साळकरांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घरवापसी केली. पणजीतील भाजप कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात दाजी साळकर, शमी साळकर आणि शैलेश बोरकर यांनीही भाजप प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, आ.बाबूश मोन्सेरात, दामोदर नाईक, नरेंद्र सावईकर, दीपक नाईक, क्रितेश गावकर, जयंत जाधव इत्यादी उपस्थित होते. यावेळी तानावडे म्हणाले, साळकर यांची विचारसरणी भाजपची आहे. अपक्ष असतानाही ते भाजप सोबतच होते. ते परत आल्याने वास्कोत भाजपचा विजय निश्चित आहे. मुरगाव व डिचोली हे दोन्ही तालुके भाजपाचे बालेकिल्ले होते आणि यापुढेही राहतील.

वास्कोतील सभेत शक्तीप्रदर्शन

भाजपमुळेच वास्कोत विकासाची गंगा वाहत आहे. कोरोना संकटात मुख्यमंत्री सावंतांनी स्वतःला झोकून दिले होते, याची जाणीव जनतेला आहे. सामान्य लोकांचे प्रश्न आपण जाणून आहोत. आगामी वास्कोतील सभेत आठ ते दहा हजार लोकांची उपस्थिती दाखवून देईल, असा विश्वास दाजी साळकर यांनी व्यक्त केला.

मुरगाव तालुक्यात वर्चस्व राखू

दाबोळी, मुरगाव, वास्को, कुठ्ठाळी या चारही मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत. सरकारने राबवलेल्या विविध योजना, गेल्या दहा वर्षात साधलेला विकास व वास्कोतील लोकांचा मिळणारा पाठिंबा पाहता येथे भाजपचे वर्चस्व राहिल. साळकर आणि आपण भाजपच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणार आहोत असा निर्धार माविन गुदिन्हो यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT