Goa CM Pramod Sawant And Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात मुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही अनिश्चितता

राज्यपालांकडून विशेष अधिवेशनाची घोषणा, प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे आमनेसामने

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात पुढील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. मावळते मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे मुख्यमंत्रिपदावरुन आमनेसामने आल्याचं बोललं जात आहे. अशातच राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी शपथविधीसाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता भाजप गोव्यात सलग तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. याला गोव्यातील मगोप आणि तीन अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे.

भाजपचे (BJP) दोन केंद्रीय निरीक्षक म्हणजेच पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आज सोमवारी संध्याकाळी गोव्यात दाखल होणार आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोव्यातील मुख्यमंत्री पदावर कोणत्याही दावा असल्याचं आणि वाद असल्याचंही नाकारलं आहे. भाजपचं केंद्रीय नेतृत्व चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाठी (CM) एकत्रित शपथविधी सोहळ्याची योजना आखत आहे, मात्र गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन वाद असल्याची चर्चाही तेवढीच रंगताना दिसत आहे.

गोव्यात भाजपने 40 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत 20 जागा जिंकल्या, ज्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. यात 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरीही 3 अपक्ष आमदारांनी भाजपलाच आपला पाठिंबा घोषित केला आहे. शनिवारी गोव्याचे मावळते मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेतली आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सरकार स्थापनेचा दावा करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे, म्हणून आपण राजीनामा दिला आहे, असं प्रमोद सावंतांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT