Praful Patel & Jitendra Awhad Dainik Gomantak
गोवा निवडणूक

प्रफुल पटेल अन् आव्हाड उद्या गोवा दौऱ्यावर, आघाडीबाबत करणार घोषणा !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड उद्या गोव्याला जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. गोव्यात विधानसभेची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये सत्तेत असणारा भाजप पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना आकर्षित करत आहे. तर दुसरीकडे विरोधक भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निकराने लढा देत आहेत. यातच गोव्यात नव्याने दाखल झालेल्या तृणमुलने महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाबरोबर युती करत भाजपला पहिल्यांदा मोठा धक्का दिला. त्यानंतर राज्यामध्ये युतीचे सत्रचं सुरु झालं.

कॉंग्रेसने विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांच्या गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षाबरोबर युती करत आपली ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यातच महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात देखील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आणण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेसने मात्र या महाविकास आघाडीच्या प्रयोगाला कोणत्याही स्वरपाचा हिरवा कंदील दाखवलेला नाही. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) उद्या गोव्याला जाणार आहेत. याच दरम्यान तिथे ते शिवसेनेबरोबर आघाडीबाबत करतील असं राजकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राऊत यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले होते की, ''महाराष्ट्रात आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सत्तेमध्ये आहोत. मात्र गोव्याबद्दल विचार करायचा झाल्यास अद्याप कॉंग्रेससोबत कोणत्याही स्वरुपात जागा वाटपाचा फॉर्म्युला झालेला नाही. यामध्ये पक्ष म्हणून त्यांच्या काही मर्यादा असतील तशाच आमच्याही काही मर्यादा आहेत. आम्ही गोव्यातील चाळीस जागांसाठी उमेदवारांची यादी तयार करत आहोत, त्यानुसार आम्ही निवडणुका लढवू. त्यासाठी 18 आणि 19 तारखेला अम्ही पुन्हा एकदा गोव्याला चाललो आहे. तेव्हा आम्ही उमेदवारांची यादीही जाहीर करु.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT