Balasaheb Thorat Dainik Gomantak
गोवा निवडणूक

देशात पंतप्रधानांकडून द्वेषाचे राजकारण

बाळासाहेब थोरात यांची टीका

दैनिक गोमन्तक

पणजी: देशात भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीने देश चालविला जात आहे हे सर्वश्रुत आहे. या देशात सत्ता मिळवणे व चालवण्याचे साधन अवलंबिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजात द्वेष निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचे राजकारण करत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला.

पणजीतील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला यावेळी गोवा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच इतर नेते उपस्थित होते. थोरात पुढे म्हणाले, की भाजप सरकार व त्यांचे ध्येय हा गोव्यात चर्चेचा विषय आहे. राज्यातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून हे राज्य अधोगतीकडे जात आहे. देशात सर्वधर्मसमभावाची परंपरा आहे व तो लोकशाहीचा पाया आहे.

तो टिकणे आवश्‍यक आहे. पंतप्रधानांची भाषणे ही देशासाठी निवेदन असायला हवीत. मात्र, ते वारंवार काँग्रेसचे नेते नेहरू यांचे नाव घेऊन व त्यांच्यावर टीका करून देशात द्वेष निर्माण करत आहेत. काँग्रेसने देशाला दिलेले योगदान हे कोणीही विसरू शकणार नाही व नाकारू शकत नाही. लोकहिताच्या दिशेने देश पुढे नेण्याचे काम फक्त काँग्रेसच करू शकतो. त्यामुळे गोव्यातील जनतेने काँग्रेसला या निवडणुकीत मोठ्या बहुमताने निवडून देऊन स्थिर सरकार स्थापण्यास संधी द्यावी.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, की माजी पर्यटनमंत्र्यांवर 30 टक्के कमिशनचा शिक्का बसला होता. पेडण्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय शहर केले. त्यामुळे तेथील स्थानिकांनी त्यांना पळवून लावले. आता ते मडगावात माझ्याविरोधात लढत देत आहेत. गोवा माईल्स आणून त्यांनी महाघोटाळा केला. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना विश्‍वासात न घेता त्यांनी कमिशनपोटी हे केले. खाणी बंद मी केल्या असे म्हणणारे राहिले नाहीत.

त्यामुळे यावेळी गोमंतकीयांनी भाजप सरकारला घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपची उलटी गणती सुरू झाली आहे. 4 आमदारांवरून 22 वर गेलेली संख्या गेल्या निवडणुकीत 13 वर आली व आता ती 8 वर येईल, असे कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Comunidade Land Bill: दुरुस्ती विधेयकाला 2 कोमुनिदादींचा पाठिंबा; चिकोळणा, चिखलीचा महसूल वाढ, लाभांशाचा दावा

Goa Rain: गोव्यात पावसाची 'नव्वदी' पार! ऑरेंज अलर्ट कायम; वाळपई, धारबांदोड्यात मुसळधार

Betul: उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे गुंडाराज! जाब विचारणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; झारखंडच्या 6 जणांना अटक

Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

SCROLL FOR NEXT