Political Fight in Canacona Constituency Dainik Gomantak
गोवा निवडणूक

काणकोणात भाजप ‘तिहेरी’ भूमिकेत

रमेश तवडकर दोन माजी भाजप आमदारांच्या कात्रीत, कॉंग्रेस सक्रिय

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोणात सध्या भाजप विरुद्ध भाजप विरुद्ध भाजप असा ‘तिहेरी’ लढा सुरू आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार रमेश तवडकर हे सध्या भाजपचे माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस व भाजपचेच माजी आमदार विजय पै खोत यांच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहिर’ अशी झाली आहे. (Political Fight in Canacona News Update)

गतवेळीही अशीच स्थिती होती. पण त्यावेळी या तिघांच्या भूमिका बदलल्या होत्या. त्यावेळी विजय पै खोत हे भाजपचे (BJP) अधिकृत उमेदवार होते. तर तवडकर हे बंडखोराच्या भूमिकेत होते. या दोघांच्या भांडणात कॉंग्रेसच्या इजिदोर यांना लॉटरी लागली होती. पण २०१९ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा समीकरणे बदलली.

माजी मंत्री तवडकर यांच्याबरोबर इजिदोर आणि पै खोत हे भाजपकडून इच्छुक होते. पण शेवटी तवडकर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे नाराज फर्नांडिस व खोत यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. परिणामी काणकोणात भाजप तिहेरी भूमिकेत दिसते. याचा लाभ कॉंग्रेसला होतो का,हे बघावे लागेल. कॉंग्रेसने (Congress) भंडारी यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांना बराच विरोध आहे. तृणमूलचे महादेव देसाई हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे. भंडारी यांना संधी दिल्याने त्यांनी तृणमूलशी (TMC) घरोबा केला. एका बाजूला कॉंग्रेसमध्ये दुही तर दुसरीकडे भाजपमध्ये फूट ,अशी सध्या स्थिती आहे. त्यात आपतर्फे अनुप कुडतरकर हे रिंगणात असून आरजीतर्फे प्रशांत पागी हे निवडणूक लढवित आहेत. कनय पागी हे अपक्ष रिंगणात आहेत.काणकोणात जर-तरची समीकरणे सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Sudarsan Pattnaik: 'तर गोव्यात अनेक वाळू शिल्प कलाकार घडतील'! पद्मश्री सुदर्शननी केले गोवन संस्कृतीचे कौतुक, म्हणाले की..

Dream Meaning: मी रात्री गाढ झोपलो आणि.....नशीब!! स्वप्नं आपल्याला काही सांगू पाहतायत का?

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

SCROLL FOR NEXT