Goa Election 2022  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

स्थानिक मतदारांना पैसे वाटप प्रकरणी शाहरुख शेख वास्को पोलिसांच्या ताब्यात

दैनिक गोमन्तक

गोवा: गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या 24 तासांवर येऊन ठेपली आहे. यातच अचारसंहितेचे उल्लंघन सातत्याने होत आहे. दरम्यान काल रात्री स्थानिक मतदारांना पैसे वाटप करताना, शाहरुख उर्फ मोहम्मद तौफिक शेख या व्यक्तीला वास्को पोलिसांनी अटक केली आहे. हा युवक फकीर गल्ली, साईनगर वास्को (Vasco) येथील रहिवाशी असून, त्याच्याकडून 1 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. (Police arrested shahrukh sheikh for distributing money to voters ahead of goa election 2022)

गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार कालावधी शनिवारी संध्याकाळी 6 वाजता संपला होता. मात्र, काही उमेदवार गुप्त प्रचार करत असल्याचे चित्र समोर येत आहे. कुचेली-खडपावाडा या ठिकाणी देखील शनिवारी रात्री भरारी पथकाने पकडलेल्या दुचाकीत 11 हजार रुपये सापडले. पोलिस पुढील चौकशी करत आहेत. म्हापसा येथे देखील पोलिसांनी कारवाई केली आहे.

तर, केपे मतदारसंघात शनिवारी रात्री काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. भाजपाचे (BJP) कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी केला असून यासंबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, अद्याप पोलिसांकडून याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT